भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी मोठी कारवाई, विनायक पोलिसांच्या ताब्यात

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी मोठी कारवाई, विनायक पोलिसांच्या ताब्यात

भय्यू महाराज यांचा विश्वासू सेवादार विनायकला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

  • Share this:

विकाससिंग चौहान, प्रतिनिधी

मध्य प्रदेश, 28 डिसेंबर : आध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणाला मोठं वळण मिळालं आहे. भय्यू महाराज यांचा विश्वासू सेवादार विनायकला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 'आपल्याला काहीजण धमक्या देत होते', अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. पोलीस आता विनायकची चौकशी करत आहे.

भय्यू महाराज यांचा सेवक विनायक हा गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होता. तो अचानक बेपत्ता झाल्यामुळे चर्चेला उधाण आलं होतं. आज खुद्द विनायक पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विनायकने पोलिसांना सांगितलं की, त्याला वारंवार धमक्या मिळत होत्या. त्यामुळे तो शहरातून पळून गेला होता. त्याला धमक्या कोण देत होतं, कशासाठी देत होतं? याचा पोलीस तपास करत आहे.

"विनायकचा आम्ही शोध घेत होतो, पण त्याच्याबद्दल कोणतीही माहिती समोर येत नव्हती, अखेर तो इंदूर इथं आला आणि पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. त्याने अद्याप कोणताही प्रकारची माहिती दिलेली नाही. प्राथमिक स्तरावर त्याची चौकशी सुरू आहे, , अशी माहिती पोलीस अधिकारी अगम जैन यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, "त्याला वारंवार धमक्या दिल्या जात होत्या, तसंच त्याच्याकडे पुरेसा पैसाही नव्हता त्यामुळे तो शहरातून पळून गेला होता. भय्यूजींना कुणी ब्लॅकमेल केलं का? याबद्दल त्याने कोणतीही माहिती दिली."

काही दिवसांपूर्वी भय्यू महाराज यांच्या जुन्या ड्रायव्हर कैलासला पोलिसांनी अटक केली होती. त्याची चौकशी केली असता, त्याने भय्यू महाराजांच्या वकिलांकडे 5 कोटींची खंडणी मागण्यासाठी कट रचला असल्याचं कबूल केलं होतं. त्यानेच विनायक हा पैसे घेऊन पळून गेल्याची माहिती दिली होती.

भय्यू महाराज यांचा विश्वास सेवक विनायक हा 12 कोटी रूपये घेऊन फरार झाला, अशी माहिती कैलासनं दिली होती. विनायकनं या प्रकरणाची कुठेही वाच्यात होऊ नये म्हणून मला 2 कोटी रूपये देण्याचं आश्वासन दिलं होतं, असंही त्यानं सांगितलं होतं. त्याच्या माहितीच्या आधारावरून पोलीस विनायकचा शोध घेत होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलासनं भय्यू महाराज यांचा खास सेवक विनायकबद्दल पोलिसांना माहिती दिली. आश्रमाची जमा झालेली रक्कम विनायक त्याच्यासमोर घेऊन पळून गेला आहे. या प्रकरणानंतर भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणालाही नवं वळण मिळालं होतं.

अखेर, आता भय्यू महाराज यांचा विश्वासू सेवादार पोलिसांसमोर हजर झाल्यामुळे काही खुलासे होती, अशी वर्तवली जात आहे.


================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 28, 2018 10:31 PM IST

ताज्या बातम्या