'भय्यू महाराजांना कोणीही ब्लॅकमेल केलं नाही'

'भय्यू महाराजांना कोणीही ब्लॅकमेल केलं नाही'

अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणात दररोज नवा ट्विस्ट निर्माण होताना दिसत आहे.

  • Share this:

इंदौर, 21 डिसेंबर : अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणात दररोज नवा ट्विस्ट निर्माण होताना दिसत आहे. 'भय्यू महाराजांना कोणीही ब्लॅकमेल केलं नाही,' असा दावा आता भय्यू महाराजांचे सेवेकरी शरद देशमुख आणि शेखर शर्मा यांनी केला आहे.

भय्यू महाराज यांचा जुन्या ड्रायव्हरला पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. भय्यू महाराजांच्या वकिलांकडे 5 कोटींची खंडणी मागण्यासाठी कट रचला होता, अशी माहिती ड्रायव्हरच्या चौकशीतून समोर आली आहे. तसंच या ड्रायव्हरने सेवेकरी शरद देशमुख आणि शेखर शर्मा यांच्यावरही आरोप केले होते. भय्यू महाराजांना कोणीही ब्लॅकमेल करणं शक्य नाही, असं म्हणत ड्रायव्हरच्या आरोपांवर या दोन्ही सेवेकरांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उत्तर दिलं आहे.

आत्महत्या प्रकरणाच्या तपासात नवा खुलासा

भय्यू महाराज आणि त्यांची पत्नी डॉ. आयुषी यांच्या वकिलाला 5 कोटी खंडणी मागणाऱ्या टोळीला इंदूर पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी जेव्हा या टोळीची चौकशी केली तेव्हा त्यांनी धक्कादायक माहिती दिली.

भय्यू महाराज यांचा जुना ड्रायव्हर कैलास या प्रकरणात सहभागी आहे. त्यानेच खंडणी मागण्यासाठी कट रचला होता. भय्यू महाराज यांच्या वकिलाकडे कोट्यवधी रूपये असल्याचा त्याला संशय होता.

भय्यू महाराज यांचा विश्वास सेवक विनायक हा 12 कोटी रूपये घेऊन फरार झाला अशी माहितीही कैलासनं दिली. विनायकनं या प्रकरणाची कुठेही वाच्यात होऊ नये म्हणून मला 2 कोटी रूपये देण्याचं आश्वासन दिलं होतं असंही या त्यानं सांगितलं. त्याच्या माहितीच्या आधारावरून पोलीस आता विनायकचा शोध घेत आहे.

एमआयजी पोलीस स्टेशनमध्ये ओल्ड पलासिया येथील राहणारे निवेश उर्फ बडजात्या यांनी 5 कोटींची खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली होती.

बीड हत्याकांड VIDEO: पोलिसांकडे माहिती घेण्यासाठी गेलेल्या 'न्यूज18 लोकमत'च्या प्रतिनिधीलाच घेतलं ताब्यात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 21, 2018 10:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading