भय्यू महाराज आत्महत्या प्रकरण : 125 जणांची चौकशी, 25 जणांचा जबाब... वर्षभरात असं उलगडलं गूढ

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरण : 125 जणांची चौकशी, 25 जणांचा जबाब... वर्षभरात असं उलगडलं गूढ

आध्यात्मिक गुरू म्हणून प्रसिद्ध असलेलं मोठं प्रस्थ भय्यू महाराज यांच्या मृत्यूला बरोबर वर्ष झालं. भय्यू महाराजांनी आत्महत्या प्रकरणाला वर्षभरात अनेक धक्कादायक वळणं मिळाली आणि समोर आलं हे सारं सत्य...

  • Share this:

इंदौर, 12 जून : आध्यात्मिक गुरू म्हणून प्रसिद्ध असलेलं मोठं प्रस्थ भय्यू महाराज यांच्या आत्महत्येला बरोबर वर्ष झालं. 12 जून 2018 रोजी त्यांच्या आत्महत्येच्या बातमीने खळबळ उडाली होती. भय्यू महाराजांचे मध्य प्रदेशाबरोबर महाराष्ट्रातही अनेक भक्त होते, चाहते होते. त्यांना भय्यू महाराजांच्या अचानक मृत्यूमुळे फार मोठा धक्का बसला. पण त्यानंतरचे धक्के बसले या आत्महत्या प्रकरणाला वर्षभरात मिळालेल्या कलाटणीमुळे. या घटनेला वर्षभरात वेळोवेळी धक्कादायक वळणं मिळाली आणि शेवटी त्यांच्या जवळची काही माणसंच त्यांना कशी ब्लॅकमेक करत होती हे उघड झालं. आपली बदनामी केली जाईल अशी भीती भय्यू महाराजांना होती, आपल्या प्रतिमेला तडा जावू नये म्हणून त्यांनी आत्महत्या केली, हे उघड झालं. भय्यू महाराज आत्महत्येला वेगळं वळण मिळालं ते एका तरुणीमुळे. पलक नावाच्या या तरुणीचे भय्यू महाराजांशी काय संबंध होते आणि तिचा या आत्महत्येशी काही संबंध आहे का याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी 125 जणांची चौकशी केली. 25 जणांचे जबाब नोंदवले.

या प्रकरणी अटक केलेले त्यांचे साहाय्यक विनायक दुधाडे, शरद देशमुख अजूनही अटकेत आहेत. पलकलासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं. ही केस न्यायालयात सुरू आहे. गेल्या जानेवारीत या केससंबंधी महत्त्वाची बातमी बाहेर आली. भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांपैकी पलकने त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित युवतीने भय्यू महाराजांवर लग्नासाठी दबाव टाकला होता. लग्न न केल्यास दाती महाराजांप्रमाणे तुमच्यावर गुन्हा दाखल करु अशी धमकी तिने दिली होती, असं तपासात उघड झालं.

महागड्या गाड्या आणि घड्या, भय्यूजी महाराजांची आलिशान लाईफस्टाईल

आध्यात्मिक गुरू भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी शुक्रवारी विनायक दुधाडे, शरद देशमुख आणि पलक या तरुणीला अटक केली. संबंधित तरुणीने लग्नासाठी भय्यू महाराजांवर दबाव टाकला होता. त्यासाठी तिने एक वर्षाचा अल्टिमेटम दिला होता.

एक वर्षाचा अल्टिमेटम

पलकने लग्नकरण्यासाठी भय्यू महाराजांना एक वर्षाचा अल्टिमेटम दिला होता. त्याची मुदत १६ जूनला संपणार होती. त्याआधीच १२ जून रोजी भय्यू महाराजांनी आत्महत्या केली.

कोण होती पलक

भय्यू महाराजांची पहिली पत्नी माधवी यांच्या निधनानंतर पलक केअर टेकर म्हणून आली होती. महाराजांच्या एकटेपणाचा फायदा घेत तिने प्रेम संबंध निर्माण केले. तिनेच महाराजांचा अश्लील व्हिडिओ तयार केला. इतक नव्हे तर वॉट्सएपवर अश्लील चॅटकरुन ते सेव्ह करायची. यात महाराजांनी १७ एप्रिल २०१७ रोजी आयुषी यांच्याशी विवाह केला. याची माहिती कळताच पलकने लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. महाराजांनी लग्नासाठी नकार दिला. त्यावर, मी तुम्हाला लग्न करण्यासाठी एक वर्षाचा मुदत देते अशी धमकी तिने दिली होती.

चीनच्या 10 जहाजांना भारताने दिली शरणागती

त्यानंतरच्या काळात तिने कपडे, दागिने आणि मोबाईलसाठी २५ लाख रुपये घेतले होते. पलकने दिलेली मुदत जून महिन्यात संपणार होती. १६ जून रोजी लग्न न केल्यास दाती महाराजांसारखे हाल करू अशी धमकी तिने दिली होती.

मास्टरमाईड विनायक आणि शरद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करण्याचा प्लॅन विनायक आणि शरद यांचा होता. यासाठी त्यांनी पलकचा वापर करुन घेतला. विनायक महाराजांवर दबाव टाकण्याचे काम करत असे. पलक तुमच्यावर शोषणाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहे. यासाठी तो महिन्याला लाखो रुपये महाराजांकडून घेत असे. विनायक आणि पलक दोघे महाराजांना अशक्त होणाऱ्या गोळ्या देत असल्याचे समोर आले आहे.

महाराज-पलक यांचे Whatsapp वरील अश्लील चॅट

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भय्यू महाराज यांच्या दुसऱ्या विवाहाच्या आधी विनायक आणि शरद यांनी पलकला सिल्व्हर स्प्रिंग येथील घरी बोलवले. त्यांनी पलक व महाराजांच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर केला. त्यात अश्लील चॅट मिळाले होते. अटक करण्यात आलेल्या विनायक दुधाडे, शरद देशमुख आणि पलक या तिघांनी महाराजांकडून पैसे घेतल्याचे पुरावे मिळाले. विनायक आणि शरद हे पलकला महाराजांवर दबाव टाकण्यासाठी प्रोत्साहन देत होते. पलकने एका वर्षात लग्न न केल्यास तुमचा देखील दाती महाराज करूअशी धमकी भय्यू महाराजांना दिली होती.

हे शूर श्वान भारत - पाक सीमेवर होणार तैनात, घुसखोरीचा लावणार छडा

या प्रकरणी महाराजांच्या जवळच्या लोकांचा जबाब नोंदवल्यानंतर अनेक गोष्टींची उलघडा झाला. तसेच काही डीजिटल पुरावे देखील पोलिसांना मिळाले. पलकसोबतचे चॅट देखील पोलिसांनी रिकव्हर केले. या तिघांच्या चॅटमधून महाराजांकडून खंडणी मागितल्याचं स्पष्ट होतं, असा निष्कर्ष पोलिसांनी काढला. पोलिसांना मिळालेल्या पुराव्यानुसार भय्यू महाराजांवर दबाव टाकून खंडणी घेण्याचा या तिघांचा कट होता, असं या प्रकरणी पोलिसांनी सांगितलं.

औषधांचे कव्हर बदलून दिल्या गोळ्या

भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणातील सर्वात धक्कादायक खुलासा म्हणजे विनायक आणि शरद यांनी औषधांचे कव्हर बदलून महाराजांना गोळ्या दिल्या होत्या. ज्या गोळ्या द्यायच्या नव्हत्या त्या देताना संशय येऊ नये म्हणून त्याचे कव्हर बदललं जायचं, असे मिश्र यांनी सांगितले. या औषधांचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला. शारिरीक क्षमता कमी करणारी ही औषधं होती, असं या प्रकरणी तपास करणारे पोलीस अधिकारी मिश्र म्हणाले.

SPECIAL REPORT : बाॅलिवूडची फिटनेस क्वीन ठाकरेंच्या रिअल 'टायगर'सोबत?

First published: June 12, 2019, 7:07 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading