भय्यू महाराजांच्या परिवाराचा वाद चव्हाट्यावर; पुण्याहून इंदौरला आजीच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या मुलीचा VIDEO VIRAL

भय्यू महाराजांच्या परिवाराचा वाद चव्हाट्यावर; पुण्याहून इंदौरला आजीच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या मुलीचा VIDEO VIRAL

Bhaiyyu Maharaj death case: भय्यू महाराज यांच्या आईच्या मृत्यूनंतर - मुलगी कुहू हिचा VIDEO प्रथमच माध्यमांसमोर आला आहे. त्यात तिने सावत्र आई आयुषी यांच्यावर आरोप केले आहेत. आजीला मुखाग्नी देऊ दिला नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. पाहा VIDEO

  • Share this:

इंदौर, 12 मे: भय्यूजी महाराज (Bhaiyyu Maharaj) यांच्या कथित आत्महत्येनंतर त्यांच्या परिवारात दिवसेंदिवस आणखी दुरावा निर्माण होत आहे. भय्यू महाराज यांची आई कुमुदिनी देवी (Kumudini Devi) देशमुख यांचं शनिवारी रात्री उशिरा निधन झालं. त्यांच्यावर अंत्यसंस्कार कुणी करायचे यावरून ताजा वाद झाल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात भय्यू महाराजांची (Bhaiyyu maharaj daughter kuhu) मुलगी कुहू हिचा VIDEO समोर आला आहे आणि आता VIRAL झाला आहे. "मी माझ्या आजीसाठी पुण्याहून इंदौरला आले. पण मला अग्नि देऊ दिला नाही," असं म्हणत थेट तिने आपल्या सावत्र आईवर म्हणजे आयुषी यांच्यावर आरोप केले आङेत.

या प्रकरणाला आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. कारण कुमुदिनी या भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात महत्त्वाच्या साक्षीदार होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून इंदौरमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आजीच्या निधनाची बातमी मिळताच रविवारी कुहू पुण्याहून इंदौरला पोहोचली. ती सरळ मुक्तिधाममध्ये गेली. इथे जात तिनं आजीवर अंत्यसंस्कार करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, भय्यूजी महाराज यांची दुसरी पत्नी आयुषीनं हे करू दिलं नाही. अनेक तास अंत्यसंस्कार कोण करणार या मुद्द्यावरुन दोघींमध्ये वाद झाला,  असं सांगतात.

मिळालेल्या माहितीनुसार, कुमुदिनी देवी इंडेक्स मेडिकल कॉलेजमध्ये भर्ता होत्या. रविवारी आजीच्या निधनाची बातमी ऐकताच कुहू दुपारी तीन वाजता इंदौरमध्ये दाखल झाल्या. स्मशानभूमीत जाताच तिनं आयुषीला सांगितलं, की आजोबा आणि वडील भय्यूजी महाराज यांचे अंतिम संस्कारही मान्य केले होते, त्यामुळे हिंदू रितीप्रमाणेच कुमुदिनी यांच्यावरही मलाच अंत्यसंस्कार करू द्यायाला हवे. मात्र, कुहू तिथे एकटी पडली. आयुषीच्या सोबत असलेल्या लोकांनी कुहूला अंत्यसंस्कार करू दिले नाहीत.

मुंबई हादरली! आधी बलात्कार मग गळ्यावरून फिरवला सुरा, बेवारस पडला होता मृतदेह

कुहू यांनी पत्रकारांशी बोलताना भावुक होत सांगितलं की, "आजीबरोबर माझा रोजचा संवाद होता. आम्ही VIDEO call वर बोलायचो. शेवटच्या तीन दिवसात तिची प्रकृती ढासळली. तिच्यासाठी मी पुण्याहून इंदौरला आले. मला तिला मुखाग्नी देण्याचा अधिकार नाकारण्यात आला."

दिवंगत भय्यू महाराजांची पत्नी आयुषी आणि त्यांच्याबरोबरच्या मंडळींनी कुहूला मुख्य अंत्यसंस्कार विधीपासून बाजूला ठेवल्याचं आश्रमाच्या वतीने सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या VIDEO मध्येही दिसतं.

करावं तसं भरावं! तरुणांनी आगीशी घेतला पंगा; अंगावर शहारे आणणारा VIDEO

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी (Bhaiyyu Maharaj Death Case) आरोपी शरद आणि विनायकचे वकील धर्मेंद्र गुर्जर आणि आशिष चौरे यांचं म्हणणं आहे, की या प्रकरणाचा तपास व्हायला हवा. कारण याप्रकरणी त्यांची आई कुमुदिनी जबाब नोंदवणार होत्या. मात्र, हे अनेक काळापासून प्रलंबित राहिलं. घटनेची माहिती मिळताच फिर्यादींनी आयुषीसह मिळून कुमुदिनी देवींची साक्ष न घेण्यासाठी अर्ज दाखल केला होता. वकील धर्मेंद्र गुर्जर म्हणाले की, आरोपींशी चर्चा केल्यानंतर ते या मृत्यूच्या चौकशीसाठीही अर्ज करू शकतात.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: May 12, 2021, 4:16 PM IST

ताज्या बातम्या