• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • भय्यू महाराज प्रकरणाची नवी माहिती, डॉ.आयुषी जबाब न नोंदवता कोर्टातून पडल्या बाहेर

भय्यू महाराज प्रकरणाची नवी माहिती, डॉ.आयुषी जबाब न नोंदवता कोर्टातून पडल्या बाहेर

सोमवारी डॉ.आयुषी शर्मा या आपला जबाब नोंदवण्यासाठी कोर्टात पोहोचल्या होत्या. परंतु...

 • Share this:
  इंदूर, 28 नोव्हेंबर : आध्यात्मिक गुरू भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाची (bhaiyyu maharaj suicide case) सुनावणी सुरू आहे. कोर्टात सुनावणी दरम्यान डॉ.आयुषी या जबाब न देताच निघून गेल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी दिवसेंदिवस नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणाची सुनावणी इंदूर येथील कोर्टात सुरू आहे. सोमवारी डॉ.आयुषी शर्मा या आपला जबाब नोंदवण्यासाठी कोर्टात पोहोचल्या होत्या. परंतु, त्याच दरम्यान त्यांच्या नातेवाईकाने फोन करून माहिती दिली की, ग्वालियर येथे त्यांच्या आजोबांचं निधन झाले आहे. त्यानंतर आयुषी यांनी ही माहिती न्यायाधिशांना सांगितली. त्यानंतर जबाब न नोंदवता त्यांना जाण्यास परवानगी देण्यात आली. सोमवारपासून आयुषी यांची उलटतपासणी केली जात आहे. पण, पहिल्याच दिवशी त्यांचा जबाब नोंदवता आला नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी ही 5 फेब्रुवारीला होणार आहे. यावेळी कैलास पाटील आणि दिनेश कुमार या दोघांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. तर 9 फेब्रुवारीला राजेश डावर आणि अमोल चौहान यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. तर दुसऱ्या दिवशी 10 जानेवारीला प्रवीण दिनकर राव आणि शेखर मदनलाल शर्मा यांचा जबाब नोंदवला जाईल. मध्यंतरी भय्यू महाराज यांची मुलगी कुहूने (kuhu)संपत्तीबद्दल मागणी केली होती. 'वडिलांची अनेक शहरांमध्ये कोट्यवधीची संपत्ती आहे. त्यामुळे आपल्या संपत्तीचा वाटा मिळावा', अशी मागणी कुहूने केली होती. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले होते. काय आहे प्रकरण? भय्यू महाराज यांनी 12 जून 2018 रोजी स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. या घटनेमुळे इंदूरसह देशात एकच खळबळ उडाली होती. भय्यू महाराज यांची एक सुसाईट नोट सुद्धा घटनास्थळावर आढळून आली होती. भय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर सहा महिन्यांनी त्यांचा सेवादार विनायक दुधाले, शरद देशमुख आणि पलक पुराणिक यांना अटक करण्यात आली होती. भय्यू महाराज यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. तेव्हापासून तिघेही आरोपी जेलमध्ये आहे.
  Published by:sachin Salve
  First published: