मराठी बातम्या /बातम्या /देश /

गावकऱ्यांचा संपर्क तुटला; एकमेव आधार असलेला लाकडी पूल गेला वाहून, घटनेचा LIVE VIDEO

गावकऱ्यांचा संपर्क तुटला; एकमेव आधार असलेला लाकडी पूल गेला वाहून, घटनेचा LIVE VIDEO

Live Video: दुथडी भरून वाहणाऱ्या नदीमुळे भटोरा गावातील नागरिकांचा संपर्काचा एकमेव आधार हिरावला आहे. दोन आठवड्यांपूर्वी बांधलेला लाकडी पूल वाहून गेला आहे.

  • Published by:  News18 Desk

हावडा, 01 ऑगस्ट: गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अतिवृष्टीमुळे नदीला आलेल्या पुरामुळे नदीवरील अनेक पूल वाहून गेल्याच्या घटना समोर आल्या होत्या. परिणामी अनेक गावांचा  संपर्क तुटल्यानं बचाव कार्यात अनेक अडचणी आल्या होत्या. नैसर्गिक आपत्तीची ही घटना ताजी असताना, आता उत्तर भारतासह पूर्व भारतात पावसाचा जोर वाढत आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत.

त्यामुळे अनेक स्थानिक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पण दुथडी भरून वाहणाऱ्या नदीमुळे भटोरा गावातील नागरिकांचा संपर्काचा एकमेव आधार हिरावला आहे. खरंतर, पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यातील भटोरा नावाचं एक छोटसं गाव आहे. नदीने वेढलेल्या या गावात प्रवेश करण्यासाठी एकमेव लाकडी पूल बांधण्यात आला आहे. पण काल रात्री नदीतील पाण्याचा प्रवाह वाढल्यानं गावकऱ्यांच्या एकमेव आधार असलेला लाकडी पूल प्रवाहासोबत वाहून गेला आहे. हा पूल वाहून जातानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

हेही वाचा-दरड कोसळली, जीव मुठीत घेऊन लोकांनी काढला पळ, पाहा LIVE VIDEO

विशेष म्हणजे गावकऱ्यांनी दोन आठवड्यांपूर्वीच हा लाकडी पूल बनवला होता. बांबूचा वापर करत हा लाकडी पूल बनवण्यात आला होता. पण काल रात्री साडेनऊच्या सुमारास हा पूल वाहून गेला आहे. त्यामुळे भटोरा गावचा इतर गावांशी असलेला संपर्क तुटला आहे. त्यामुळे गावकरी अडकून पडले आहेत. त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या घटनेचा लाइव्ह व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे.

First published:

Tags: Rain flood, West bengal