विदिशा, 8 मार्च : विदिशा परिवार परामर्श केंद्रातून एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. लग्नमंडपात भटजींनी नवरीला ‘जी’ म्हणून संबोधल्या कारणाने पतीने नवरीवर संशय व्यक्त केला आहे. हे प्रकरण इतकं टोकाला पोहोचलं की लग्नानंतर काही दिवसात त्याने पत्नीकडे घटस्फोटाची मागणी केली आहे.
या घटनेनंतर पत्नी माहेरी निघून गेली. दोन्ही कुटुंबात समेट न झाल्याने हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं आहे. परिवार परामर्श केंद्राचे सल्लागार वकील मदनकिशोर शर्मा आणि आरक्षक पूजा त्रिपालिया यांनी सांगितलं, की हे प्रकरण ग्यारसपूर तालुक्यातील एका गावातील आहे. पतीने दिलेल्या माहितीनुसार, सहा महिन्यांपूर्वी दुसऱ्या गावातील एका तरुणीसोबत त्याचा विवाह झाला होता. लग्नाच्या काही दिवसांनंतरच ती माहेरी निघून गेली. आता ती सासरी येण्यास तयार नाही. यावर सासरची मंडळी चिंता व्यक्त करीत आहेत.
हे वाचा - पत्नीची हत्या करून पोलिसांत केला चौथा पती, सांगितलं धक्कादायक सत्य
परामर्श केंद्रात दोन्ही पक्षांना बोलावून चर्चा करण्यात आली. पत्नी म्हणाली, लग्नादरम्यान भटजी माझ्याशी ‘जी’ लावून बोलत होते. त्यावेळेपासून पती संशय घेत होता. नेहमी मारहाण करीत असे. त्यामुळे त्याच्यासोबत राहायचे नसून तलाक घ्यायचे आहे, असे तरुणीने सांगितले.
पती म्हणाला, तिला भटजीसोबत लग्न करायचे आहे
तर दुसरीकडे पतीने वेगळीच बाब समोर आणली आहे. पती म्हणाला, 'लग्नानंतर जेव्हा पत्नी घरी आली तेव्हा तिने भटजी व तिच्यामधील प्रेमप्रकरणाचा खुलासा केला. मुलीच्या गावातील मंदिरात हा भटजी राहतो.' मी त्याच्यावर प्रेम करत असून त्याच्याशी लग्न करणार असल्याची बाब पत्नीने आपल्याला सांगितल्याचा धक्कादायक खुलासा पतीने केला आहे. मात्र तरुणीचे कुटुंबीय यासाठी तयार नव्हते. लग्नानंतर पतीने सर्व विसरुन जा, आपण नव्याने आयुष्य सुरू करू असं सांगितलं मात्र ती ऐकत नसल्याची बाब पतीने स्पष्ट केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: After marriage, Divorce