21 वर्षीय तरुणीला चावला साप, डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर स्मशानात युवती उठून बसली!

21 वर्षीय तरुणीला चावला साप, डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर स्मशानात युवती उठून बसली!

एका 21 वर्षीय तरुणी श्वेताला सर्पदंश झाल्याने मृत घोषित करण्यात आलं. त्यानंतर स्मशानभूमीत तिच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. इतक्यात असा काही प्रकार झाला की सगळ्यांनाच धक्का बसला.

  • Share this:

भरतपूर(राजस्थान), 20 सप्टेंबर : मृत व्यक्ती कधीही जिवंत होत नाही. बरं एखादा व्यक्ती मृत्यू पावला तर त्याला पुन्हा जिवंत करण्याइतकं विज्ञान अद्याप पुढे गेलेलं नाही. पण मृत व्यक्ती स्मशानभूमितून घरी परत आली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भरतपूरच्या आरबीएम रुग्णालयात एका 21 वर्षीय तरुणी श्वेताला सर्पदंश झाल्याने मृत घोषित करण्यात आलं. त्यानंतर स्मशानभूमीत तिच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. इतक्यात असा काही प्रकार झाला की सगळ्यांनाच धक्का बसला. अचानक मृत तरुणीचा श्वास पुन्हा सुरू आल्याने जितका आनंद झाला तितका सगळ्यांना धक्काही बसला.

जेव्हा श्वेताला मृत घोषित केलं त्यानंतर तिला स्मशानभूमीत नेण्यात आलं. यावेळी श्वेता जिवंत असल्याचा काहींना संशय आला आणि त्यानंतर त्यांनी तिला पाहिलं तर जिवंत असल्याचं समोर आलं. श्वेता जिवंत असल्यामुळे कुटुंबीयांचा आनंद गगनात मावत नव्हता. तिला सगळ्यांनी घरी आणलं. सर्पदंश झाल्यामुळे तिच्यावर योग्य उपचार करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, तिची स्थिती आता ठिक असल्याचंही सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्मशानात श्वेतावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू होती. यावेळी ती जिवंत असल्याचा संशय उपस्थित काही लोकांना आला. तिचा श्वास सुरू होता आणि ती उठून बसण्याचा प्रयत्न करत होती.  त्यानंतर तिची नाडी तपासली असता ती जिवंत असल्याचं समोर आलं. तिला जिवंत पाहून सगळ्यांना आधी धक्का बसला. श्वेता जिवंत असल्याची माहिती सगळ्यांना देण्यात आली. तर श्वेताचा जीव वाचला म्हणजे हा चमत्कारच असल्याची चर्चा सध्या सगळ्या गावात आहे.

स्मशानात श्वेता जिवंत झाल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली...

श्वेताला सर्पदंश झाला होता. त्यावर तिला तात्काळ रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. पण रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. घरातल्या तरुण मुलीला अशा प्रकारे गमावल्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली होती. पण अगदी स्मशानात गेल्यानंतर मुलीचे प्राण परत आल्यामुळे सगळ्यांनमध्ये आनंदाचं वातावरण आहे. खरंतर याआधीही असाच एक प्रकार झाला. तेव्हा नेमकं काय झालं होतं पाहुयात...

अंत्यसंस्कारानंतर सुरू होती श्राद्धाची तयारी, अचानक घरी पोहोचला मृत तरुण!

गमावलेले प्राण कधीही परत येत नाहीत. विज्ञानातही मृत व्यक्ती जीवंत करण्यासाठी अद्याप कोणतंही तंत्रज्ञान नाही आहे. पण मृत व्यक्ती जीवंत होऊन घरी आल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंत्यसंस्कार झाल्यानंतर कुटुंबीय घरी येण्याआधीच मृत तरुण घरी आला होता. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. ज्याचे अंत्यसंस्कार केले त्यालाच घरी पाहिल्यानंतर सगळ्यांच्याच हृदयाचा ठोका चुकला. पण सगळा प्रकार उघड झाल्यानंतर कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेना. या युवकाला पाहण्यासाठी सगळ्या गावकऱ्यांनी सध्या गर्दी केली आहे.

ही घटना मुशहरी पोलिस स्टेशन परिसरातील बुधनगर गावची आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधनगरा इथल्या सेवानिवृत्त सैनिक रामसेवक ठाकूर यांचा मुलगा संजीव कुमार 25 ऑगस्ट रोजी अचानक बेपत्ता झाला. बरीच शोधाशोध केल्यानंतरही कोणालाच तो सापडला नाही. अशा परिस्थितीत 30 ऑगस्ट रोजी कुटूंबाने त्याच्या बेपत्ता झाल्याची तक्रार मुशहरी पोलीस ठाण्यात नोंदवली. दरम्यान, मीनापुरात एक पाण्यात पडलेला मृतदेह आढळला. तो मृतदेह बेपत्ता तरुणाचा असल्याचा पोलिसांचा अंदाज होता. नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवून घेतली आणि आपलाच मुलगा असल्याचं म्हटलं. नंतर त्यांनी तरुणावर अंत्यसंस्कार केले.

संजीव असं बेपत्ता झालेल्या युवकाचं नाव आहे. बुधवारी संजीव अचानक गावात पोहोचला. संजीवला पाहिल्यावर पालक आणि कुटुंबीय खूप खूश झाले आणि त्यांनी इतर नातेवाईकांना याची माहिती दिली. खरंतर संजीव 25 ऑगस्ट रोजी न सांगता घराबाहेर पडला. संजीवच्या वडिलांनी सांगितलं की, रुग्णालयात मृतदेह संजीव सारखाच होता, त्यामुळे त्यांची ओळख चुकली. मुशहरी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची पोलिसांत नोंद करण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे. दरम्यान, संजीवच्या नातेवाईकांनी जाळला तो मृतदेह नेमका कोणाचा होता, याचाही तपास सुरू आहे.

VIDEO : युती होणार की नाही? उद्धव ठाकरे म्हणतात...

First published: September 20, 2019, 5:12 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading