VIDEO: गर्लफ्रेंड सांगणे पडले महागात,तरुणीने काठीने झोड-झोड झोडपले

VIDEO: गर्लफ्रेंड सांगणे पडले महागात,तरुणीने काठीने झोड-झोड झोडपले

राजस्थानच्या भरतपूर शहरात एका युवकाने एक मुलीची झेड काढल्याने तिने त्याची काठीने मारहाण केल्याचा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.

  • Share this:

राजस्थान, १७ जुलै : राजस्थानच्या भरतपूर शहरात एका युवकाने एक मुलीची झेड काढल्याने तिने त्याची चक्क काठीने मारहाण केल्याचा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो गेल्या आठवड्यातील असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या व्हिडिओमध्ये ती मुलगी शहरातील मुखर्जी नगर सेक्टर-३ मध्ये त्या युवकाची धुलाई करताना दिसत आहे. यावेळी ती मुलगी म्हणते की, ' तू काय स्वतःला डोनाल्ड ट्रम्पचा (अमेरिकेचे राष्ट्रपती) मुलगा समजतोस का ?, जर तसं असेल तर हा तुझा मोठा गैरसमज आहे. कुठली पण मुलगी असो तिला कमी कधीच लेखू नका. ती तिचा हक्क मांडता येतो'.

आजकाल सोशल मीडिया वर व्हिडिओ व्हायरल होण्याचा प्रकार खूपच वाढला आहे. काही फायद्याचे ठरतात तर काही असेच व्हायरल होतात. राजस्थानमध्ये असाच एक सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झालाय. भरतपूर शहरातील या मुलीच्या म्हणण्यानुसार गेले अनेक दिवस तो मुलगा तिचा पाठलाग करत होता. आणि तिचं नाव खराब करण्याच्या हेतूने विविध अफवाही पसरवण्याचा प्रयत्न त्याने केला. ज्या दिवशी त्या मुलीने त्या युवकाला धडा शिकवत त्याची धुलाई केली तेंव्हा एका युवकाने त्याचा व्हिडिओ बनवला. आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. यामध्ये ती मुलगी गर्दीत त्या युवकाची धुलाई करताना दिसत आहे. आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांना त्याच्या गैर वर्तवणुकीबद्दल सांगत आहे.

First published: July 17, 2018, 6:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading