Home /News /national /

होऊ दे खर्च! सूनेची इच्छा पूर्ण करण्यासाठी सासऱ्यानं मागवलं हेलिकॉप्टर

होऊ दे खर्च! सूनेची इच्छा पूर्ण करण्यासाठी सासऱ्यानं मागवलं हेलिकॉप्टर

राजस्थानमधील (Rajasthan) भरतपूर(Bhartpur) जिल्ह्यातल्या एका नवरीला देण्यात आलेल्या निरोपाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. भरतपूर जिल्ह्यातल्या छतरपूर गावातली ही घटना असून 'गावातील कोणत्याही नवरीला आजवर कधीही इतक्या थाटात निरोप देण्यात आला नाही', असं गावकरी सांगतात.

पुढे वाचा ...
    भरतपूर,11 डिसेंबर:  लग्न थाटात व्हावं, इतरांपेक्षा वेगळं व्हावं अशी अनेकांची इच्छा असते.  त्यामुळे एखाद्या विशिष्ट ठिकाणी  लग्न करण्याची पद्धत (Destination Wedding) आता चांगलीच रुजलीय. लग्नामधला प्रत्येक लहान-मोठा प्रसंग कायमस्वरुपी आठवणीत राहावा यासाठी दोन्हीकडची मंडळी त्यांच्या परीनं प्रयत्न करत असतात. राजस्थानमधील (Rajasthan) भरतपूर(Bhartpur) जिल्ह्यातल्या एका नवरीला देण्यात आलेल्या निरोपाची  सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. भरतपूर जिल्ह्यातल्या छतरपूर गावातली ही घटना असून 'गावातील कोणत्याही नवरीला आजवर कधीही इतक्या थाटात निरोप देण्यात आला नाही', असं गावकरी सांगतात. सूनेची इच्छा सासऱ्याकडून पूर्ण भरतपूर जिल्ह्यातल्या करौली गावातील नरेंद्र सिंह यांच्या मुलाचे छतरपूर गावातल्या मुलीशी लग्न झाले. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरीला निरोप देण्याचा कार्यक्रम होता. आपल्याला हेलिकॉप्टरमधून निरोप मिळावा अशी नवरीची इच्छा होती. ती इच्छा तिच्या सासऱ्यांना समजली तेंव्हा त्यांनी नवरीला न कळत तिची इच्छा पूर्ण करण्याचं ठरवलं. हे वाचा-26/11 हल्ल्याच्या मास्टरमाईंडला इम्रान खान सरकार दरमहा देणार 'पॉकेटमनी'! मुलीच्या पाठवणीचा कार्यक्रम सुरु असतानाच गावात हेलिकॉप्टर दाखल झालं. त्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली. हा सर्व खटाटोप आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी केला असल्याचं समजताच नव्या सुनेला आश्चर्याचा धक्काच बसला. सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर तिने आपल्या नवऱ्यासह सासरी जाण्यासाठी हेलिकॉप्टरमधून उड्डाण घेतले. सासऱ्यानं किती रुपये खर्च केले? नव्या जोडप्यासह हेलिकॉप्टर मुलाच्या गावात पोहचले तेंव्हा तिथे देखील मोठी गर्दी जमली. बहुतेक गावकरी नव्या जोडप्याचं स्वागत करण्यापेक्षा हेलिकॉप्टर पाहण्यातच दंग होते. दोन्ही गावातील प्रवास हेलिकॉप्टरनं पूर्ण करण्यासाठी पाच लाख रुपये खर्च आला. सासऱ्यानं सुनेला भेट म्हणून हा सर्व खर्च आनंदानं केल्याची माहिती मुलाकडच्या लोकांनी दिली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Marriage, Rajasthan

    पुढील बातम्या