मुंबई, 13 मार्च : सरकारी टेलिकाॅम कंपनी बीएसएनएल ( भारत संचार निगम लिमिटेड ) मोठ्या संकटात सापडलीय. आर्थिक अडचणींना तोंड देणाऱ्या बीएसएनएलनं जवळजवळ 1.76 लाख कामगारांना फेब्रुवारीचा पगार दिलेला नाही. दूरसंचार मंत्री मनोज सिन्हांना पत्र लिहून लवकरच यावर तोडगा काढायला सांगितलंय. बीएसएनएलची 55 टक्के मिळकत पगारात जाते. कंपनीच्या पगाराचं बिल दरवर्षी 8 टक्के वाढतं. पण कंपनीची मिळकत तीच राहतेय.टाइम्स आॅफ इंडियाच्या माहितीनुसार मार्च महिन्याचा पगार उशिरा मिळणार आहे. कंपनीकडे बिझनेस कंपनींनी भरलेल्या बिलातून पैसे येतात. बीएसएनएल बोर्डानं बँकेकडून कर्ज घेण्यास मंजुरी दिलीय. दूरसंचार विभागानं अजून यावर काही हालचाल केलेली नाही. बीएसएनएसचा तोटा दरवर्षी वाढतोच आहे. या कंपनीला 2018च्या आर्थिक वर्षांत 8000 कोटी रुपयांचा तोटा झालाय.2017मध्ये 4,786 कोटी रुपये तोटा झालाय.मनोज सिन्हांनी बीएसएनएलच्या सगळ्या युनियन आणि असोसिएशन्सना एक पत्र लिहिलंय. त्यांनी लिहिलंय, इतर टेलिफोन आॅपरेटर्सनाही आर्थिक संकटांना सामना करावा लागणार आहे. पण कंपनी गुंतवणूक करून परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतेय.बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, केरळ, जम्मू, काश्मीर, ओडिशा आणि काॅर्पोरेट कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीचा पगार द्यायला सुरुवात केलीय. कमाई होईल तसे पगार दिले जातील. कारण सरकारनं अजून कुठलंच आर्थिक सहाय्य केलं नाही. म्हणून पगाराला उशीर होतोय.
VIDEO: 'पवार हे अष्टपैलू नेते, ज्योतिषी कधीपासून झाले?'