वीर सावरकरांना भारतरत्न: केंद्र सरकारने केलं मोठं वक्तव्य!

वीर सावरकरांना भारतरत्न: केंद्र सरकारने केलं मोठं वक्तव्य!

सावरकरांना भारतरत्न देण्यासंदर्भातील एका प्रश्नावर केंद्र सरकारने संसदेत उत्तर दिले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर: गेल्या अनेक वर्षांपासून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना 'भारतरत्न' देण्याची मागणी केली जात आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने जाहीरनाम्यात राज्य सरकार सावरकरांना 'भारतरत्न' देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपूरावा करेल असे आश्वासन दिले होते. आता यासंदर्भात केंद्र सरकारने एक मोठे वक्तव्य केले आहे. सावरकरांना 'भारतरत्न' देण्यासंदर्भातील एका प्रश्नावर केंद्र सरकारने संसदेत उत्तर दिले आहे.

सावरकरांना 'भारतरत्न' पुरस्कार देण्यासाठी शिफारस आली आहे का असा प्रश्न संसदेत विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना केंद्र सरकारने सांगितले की, अशी शिफारस जर करण्यात आली तर सावरकरांना 'भारतरत्न' दिला जाऊ शकतो. त्याच बरोबर केंद्रीय गृहमंत्रालयाने हे देखील स्पष्ट केले की, 'भारतरत्न' हा शिफारशीशिवाय देखील दिला जाऊ शकतो.

देशातील सर्वोच्च नागरी सन्मान असलेला 'भारतरत्न' पुरस्कार सावरकरांना द्यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात आहे. सावरकरांना पुरस्कार देण्यावरून अनेकांचा विरोध देखील आहे. यासाठी विशेषत: काँग्रेसचा विरोध आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या या उत्तराकडे पाहिजे जात आहे. 'पद्म' पुरस्कार आणि 'भारतरत्न' हे सन्मान देण्याची प्रक्रिया वेगवेगळी आहे. पद्म पुरस्कार देण्यासाठी एका समितीची नियुक्ती केली जाते. पण 'भारतरत्न' हा सन्मान देताना अशी कोणतीही समिती नसते. हा विषय थेट पंतप्रधान कार्यालयाशी संबंधित असतो. 'भारतरत्न' हा सन्मान देण्यासाठी कोणाच्या शिफारशीची गरज नसते. जी व्यक्ती या सन्मानाच्या योग्य वाटते त्याला हा सरकारकडून हा सन्मान दिला जातो.

गृहमंत्रालयाच्या या उत्तराने सरकारने हे स्पष्ट केले आहे की 'भारतरत्न' सन्मान देण्यासाठी कोणाच्या शिफारशीची गरज नाही. तो निर्णय सरकार स्वत:हून घेऊ शकतो.

सावरकर कुटुंबियांची प्रतिक्रिया

केंद्र सरकारने घेतलेल्या या भूमिकेवर बोलताना सावरकरांचे पणतू रणजीत सावरकर म्हणाले की, आम्ही कधीच अशा कोणत्याही सन्मानाची मागणी केलेली नाही. पण अशा प्रकारचा सन्मान दिल्यास आम्ही त्याचे स्वागतच करू.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 19, 2019 02:43 PM IST

ताज्या बातम्या