नवी दिल्ली, 14 जानेवारी : पंजाबमधील जालंधर येथील काँग्रेसचे खासदार चौधरी संतोख सिंह यांचे आज (दि.14) निधन झाले. भारत जोडो यात्रेत ते सहभागी झाले होते, तिथे त्यांची अचानक तब्येत बिघडली. त्यांना फगवाडा येथील विर्क रुग्णालयात नेण्यात आले. येथे त्यांचा मृत्यू झाला.
#WATCH | Punjab: Congress MP Santokh Singh Chaudhary was taken to a hospital in an ambulance in Ludhiana, during Bharat Jodo Yatra. Details awaited.
(Earlier visuals) pic.twitter.com/upjFhgGxQk — ANI (@ANI) January 14, 2023
ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत फिरत असताना त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आणि त्यांची प्रकृती खालावली. या दरम्यान राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा थांबवली आणि तात्काळ हॉस्पिटल गाठले. परंतु त्यांचा यामध्ये मृत्यू झाला.
आज सकाळी 7 वाजता लुधियानाच्या लोदोवाल येथून राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला सुरूवात झाली. ही यात्रा जालंधरमधील गोराया येथे सकाळी 10 वाजता पोहोचणार होती, तिथे जेवणासाठी ब्रेक होणार होता. त्यानंतर दुपारी 3 वाजता हा प्रवास पुन्हा सुरू होणार होता आणि सायंकाळी 6 वाजता फगवाडा बस स्थानकाजवळ थांबणार होती परंतु या वेळेत बदल होण्याची शक्यता आहे.
आज यात्रेचा रात्रीचा मुक्काम कपूरथला येथील कोनिका रिसॉर्टजवळील मेहत गावात होता, मात्र आज सकाळी 9.30 च्या सुमारास काँग्रेस खासदार संतोख सिंह चौधरी यांचे निधन झाल्याने यात्रा थांबवण्यात आली आहे. मात्र, आज ही यात्रा थांबवली जाणार की राहुल गांधी पुन्हा यात्रेत सहभागी होणार याबाबत काँग्रेसकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 30 जानेवारीला श्रीनगर, काश्मीरमध्ये संपणार आहे. काश्मीरमधील लाल चौकात तिरंगा फडकवून राहुल गांधी यात्रेची सांगता करणार आहेत. भारत जोडो यात्रेच्या समारोपाला काँग्रेसला विरोधी एकीची ताकद दाखवायची आहे, त्यासाठी 21 समविचारी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. केसीआर ते अरविंद केजरीवाल, एचडी देवेगौडा आणि ओवेसी यांच्यापर्यंत जवळपास 8 राजकीय पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आलेले नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bharat Jodo Yatra, Congress, Rahul gandhi