उद्या भारत 'बंद', बँकेची आणि पैशाची कामं आजच उरका; ATM ला बसू शकतो फटका

उद्या भारत 'बंद', बँकेची आणि पैशाची कामं आजच उरका; ATM ला बसू शकतो फटका

देशातल्या मोठ्या कामगार संघटनांनी उद्या (8 जानेवारी) देशव्यापी 'बंद'ची हाक दिली आहे. या बंदमुळे प्रामुख्याने बँकिंग क्षेत्रावर परिणाम होईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 7 जानेवारी : देशातल्या मोठ्या कामगार संघटनांनी उद्या (8 जानेवारी) देशव्यापी 'बंद'ची हाक दिली आहे. या बंदमुळे प्रामुख्याने बँकिंग क्षेत्रावर परिणाम होईल. बँक कर्मचारी संपात सहभागी होण्याची शक्यता असल्याने ATM मधले पैसे संपेपर्यंतच ती सुरू राह. त्यामुळे बँकेचे व्यवहार आणि पैसे काढण्याचं काम आजच करून घ्या.

देशातल्या 10 मोठ्या कामगार संघटनांनी एकत्रितपणे बंदची हाक दिली आहे. 25 कोटी लोक या बंदमध्ये सहभागी होतील, असं या संघटनांचं म्हणणं आहे. जनतेविरोधातल्या धोरणांच्या निषेधार्थ भारत बंद करत आहोत, असं या संघटनांनी एकत्रितरीत्या काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

INTUC, AITUC, HMS, CITU, AIUTUC, TUCC, SEWA, AICCTU, LPF, UTUC या आणि इतर स्थानिक संघटना या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. एअर इंडिया विकण्याची अगोदरपासूनच चर्चा आहे. रेल्वेचंही खासगीकरण करण्याच्या तयारीत सरकार आहे. BSNL-MTNL विलीनीकरण झाल्याने 93600 कामगारांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. या खासगीकरण धोरणाविरोधात उद्याचा बंद आहे, असं पत्रकात म्हटलं आहे. सेंट्रल ट्रेड युनियन - सीटूच्या (CITU) वतीने पत्रक प्रसिद्धीस देण्यात आलं आहे.

पाहा VIDEO -  JNU नंतर अहमदाबादमध्येही राडा, ABVP-NSUI कार्यकर्ते भिडले

कर्माचाऱ्यांच्या 12 विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे देशभारातील उद्योग बंद पडून बेरोजगारी वाढणार असल्यामुळे हा संप करत असल्याचं कामगार नेते विश्वास उटगी म्हणाले.

2 जानेवारीला झालेल्या बैठकीत सरकारतर्फे कामगारांना कुठलंही ठोस आश्वासन न मिळाल्याने कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली. या बंदमध्ये देशभरातल्या काही महाविद्यालय आणि विद्यापीठातल्या विद्यार्थी संघटनांनीही सहभागी व्हायचं ठरवलं आहे. JNU मध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ते बंदमध्ये सहभागी होणार आहेत.

------------------

अन्य बातम्या

पुण्यातही राष्ट्रवादीचा राडा, ABVPच्या कार्यालयाला फासलं काळं

वाढदिवसाची पार्टी करत असताना अचानक बुडाली बोट, मुंबईच्या समुद्रातील थरारक VIDEO

धक्कादायक! पाण्याच्या सीलबंद बाटलीत आढळला बेडूक, पाहा VIDEO

...6,6,6,6,6 KKRच्या खेळाडूने गाजवली बिग बॅश लीग, VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 7, 2020 03:40 PM IST

ताज्या बातम्या