S M L

#BharatBandh : भारत बंदला उत्तरेकडच्या राज्यात हिंसक वळण, देशभरात 5 आंदोलकांचा मृत्यू

अॅट्रॉसिटी कायद्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात आज दलित-आदिवासी संघटनांनी 'भारत बंद' पुकारला आहे.

Sachin Salve | Updated On: Apr 2, 2018 05:56 PM IST

#BharatBandh : भारत बंदला उत्तरेकडच्या राज्यात हिंसक वळण, देशभरात 5 आंदोलकांचा मृत्यू

नवी दिल्ली, 02 एप्रिल : अॅट्रोसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरोधात दलित संघटनांनी भारत बंदची हाक दिली असून या आंदोलनाला हिंसक वळण मिळालंय.  मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर गोळीबार केल्यानं प्रकरण चांगलंच चिघळलंय.  ग्वाव्हेरमध्ये दोघांचा तर मुरैनात एकाचा मृत्यू झालाय. आतापर्यंत मध्य प्रदेशमध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.

भारत बंदला सगळ्या राज्यात प्रतिसाद मिळाला नसला तरी उत्तर भारतातल्या राज्यात मोठ्या प्रमाणावर दलित संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. पाटणा, रांची, लखनौ, जयपूर, लुधियानामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय. ठिकठिकाणी आंदोलनकर्त्यांनी जाळपोळ केल्याच्या घटना घडल्यात.. तर अनेक ठिकाणी आंदोलन पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागलाय. राजस्थानमध्ये देखील आंदोलनादरम्यान एकाचा मृत्यू झालाय. दुसरीकडे बिहारमध्ये आंदोलकांनी रास्ता रोको केलाय. आरामध्ये रेल रोको करण्यात आला असून पंजाबच्या अमृतसरमध्येही कडोकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

अॅट्रॉसिटी कायद्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात आज दलित-आदिवासी संघटनांनी 'भारत बंद'ची हाक दिली आहे. राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे नेते, आमदार जिग्नेश मेवाणी यांनी या बंदबाबतची माहिती ट्विटरवर दिली असून लोकांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 2, 2018 02:14 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close