मराठी बातम्या /बातम्या /देश /

Bharat Bandh : तुमच्यावर काय परिणाम होणार? काय राहील सुरू, काय बंद?

Bharat Bandh : तुमच्यावर काय परिणाम होणार? काय राहील सुरू, काय बंद?

Farmer Protest: उद्या 8 डिसेंबर रोजी भारत बंदची (Bharat Bandh) घोषणा केली आहे. या आंदोलनाचा महाराष्ट्रात काय परिणाम दिसेल?

Farmer Protest: उद्या 8 डिसेंबर रोजी भारत बंदची (Bharat Bandh) घोषणा केली आहे. या आंदोलनाचा महाराष्ट्रात काय परिणाम दिसेल?

Farmer Protest: उद्या 8 डिसेंबर रोजी भारत बंदची (Bharat Bandh) घोषणा केली आहे. या आंदोलनाचा महाराष्ट्रात काय परिणाम दिसेल?

  • Published by:  News18 Desk
दिल्ली, 07 डिसेंबर : मोदी सरकारने मांडलेल्या कृषी कायद्याविरोधातला (Farmers bill) शेतकरी आंदोलनाचा (Farmers protest) भडका आता संपूर्ण देशभर पसरला आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबर रोजी 'भारत बंद' पुकारला आहे. या 'बंद'ला BJP व्यतिरिक्त इतर अनेक राजकीय संघटनांनीही पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे कुठल्या सेवा आंदोलनामुळे बाधित होतील, शहरं सुरू राहतील का हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. केंद्र सरकारने मांडलेल्या कृषी कायदे बदलाला (Agriculture reforms bill) विरोध म्हणून प्रामुख्याने पंजाब, हरियाणा राज्यांतल्या शेतकी पेटून उठला. दिल्लीच्या सीमेवर या शेतकऱ्यांचं आंदोलन गेले किती तरी दिवस सुरू आहे. एवढ्या दिवसांच्या निष्फळ प्रयत्नांनतर 8 December ला शेतकऱ्यांनी देशव्यापी बंदचं आवाहन केलं आहे. काय होणार परिणाम? दिल्लीकडे जाणारा प्रत्येक महामार्ग आणि रस्ता जाम करण्याचं शेतकऱ्यांनी ठरवलं आहे. तसंच भारत बंदचा योग्य परिणाम साधण्यासाठी शेतकरी देशभर जागोजागी रस्ते आणि टोलनाके ठप्प करण्याच्या पवित्र्यात आहेत. त्यामुळे अनावश्यक आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवास टाळलेला बरा. या भारत बंदला अनेक राजकीय पक्षांनी आपलं समर्थन दिलं आहे. यामध्ये काँग्रेस, आप, शिवसेनेसह अनेक डाव्या संघटना आहेत. शेतकरी आंदोलनाने आता आक्रमक पावित्रा घेतला आहे. या संपाचा परिणाम शहरात होणाऱ्या भाजीपाला पुरवठ्यावर होऊ शकतो. कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या दुधाबरोबरच फळ व पालेभाज्या मिळण्याची शक्यता कमीच आहे. पण बंद दरम्यान अॅम्बुलन्ससह इतर आपत्कालीन सेवा चालूच राहतील. 'उद्या 8 डिसेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली आहे, जी सकाळपासून सुरू होईल आणि संध्याकाळी उशिरापर्यंत चालेल. या संपाचा परिणाम फळ व पालेभाज्याच्या पुरवठ्यावर होणार आहे. या संपाच्या दरम्यान सर्व दुकाने आणि व्यवसाय बंद राहतील. या आंदोलनात कुणालाही हिंसा करण्याची परवानगी दिली जाणार नाही. जर कुणी हिंसा करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल', अशी माहिती शेतकरी नेते बलदेवसिंग यादव यांनी दिली. पंजाबात सर्व रेस्टॉरंट्स, हॉटेलं, दुकानं शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बंद राहण्याची शक्यता आहे. तिथल्या हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनने भारत बंदला पाठिंबा दिला आहे. मुंबई, पुण्यात काय परिस्थिती? महाराष्ट्रातूनही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे. राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातील तमाम माथाडी कामगार आणि व्यापारी संप करणार आहेत. सार्वजनिक वाहतूक सुरळीत मुंबईत उद्या बेस्ट बसेस सेवा सरू राहणार आहे. या बसेस ‘भारत बंद’चा भाग असणार नाहीत, अशी माहिती बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाई अॅण्ड ट्रान्सपोर्टच्या जनसंपर्क कार्यालयाने दिली.  मुबंईतील टॅक्सी सेवा नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्याचा निर्णय टॅक्सी संघटनेने घेतला आहे. त्यामुळे मुंबईतल्या बस आणि टॅक्सीवर याचा परिणाम जाणवणार नाही. पुण्यातही वाहतुकदारांनी किंवा पीएमपीच्या वतीने कुठलीही सूचना दिलेली नाही. बँकेच्या कामकाजावर परिणाम महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी महासंघाने (Maharashtra state bank employees federation) भारत बंदला पाठिंबा दर्शविला आहे. तसंच ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननेही (All India Bank Employees Association) संपाला पाठिंबा दिला आहे. ही भारतातील सर्व सरकारी बँकांची संघटना आहे.
First published:

Tags: Farmer, Protesting farmers

पुढील बातम्या