'मी सावरकर नव्हे राहुल गांधी.. माफी मागायची असेल तर मोदी-शहांनीच माफी मागावी'

'मी सावरकर नव्हे राहुल गांधी.. माफी मागायची असेल तर मोदी-शहांनीच माफी मागावी'

'मी राहुल सावरकर नाही, मी राहुल गांधी आहे. मी माफी मागणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच देशाची माफी मागावी, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी रामलीला मैदानावर 'भारत बचाव' रॅलीत भाजपवर जोरदार घणाघात केला.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 डिसेंबर: 'मी राहुल सावरकर नाही, मी राहुल गांधी आहे. मी माफी मागणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच देशाची माफी मागावी, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी रामलीला मैदानावर 'भारत बचाव' रॅलीत भाजपवर जोरदार घणाघात केला. शनिवारी सकाळी 10.30 वाजता रॅलीला सुरुवात झाली. तत्पूर्वी, प्रियांका यांनी भाजपच्या 'मोदी है तो मुमकिन है' या घोषणेवर टीका केली. भाजप आहे तर देशात बेरोजगारी, महाग कांदा आणि 4 कोटी नोकऱ्या संपुष्टात येणे शक्य असल्याचे प्रियांका यांनी यावेळी सांगत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

राहुल गांधींनी 'रेप इन इंडिया' वक्तव्य केल्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली होती. दरम्यान, मी माफी मागणार नाही, माफी मागायची असेल तर पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशाची माफी मागावी, असे खडेबोल राहुल गांधी यांनी सुनावले.

शेतकरी, कामगारांशिवाय देशाचा विकास अशक्य आहे. देशाच्या तरुणाच्या हातात रोजगार असेल तर विकास होईल. राष्ट्रीय विकासदर 9 टक्क्यांवरून थेट 4.5 टक्क्यांवर आणला. मोदींनी देशाची अर्थव्यवस्था मजबूत करायला हवी होती. शत्रुंनी नाहीतर नरेंद्र मोदींनी अर्थव्यवस्था कमकुवत केली. गेल्या 5 वर्षांत अदाणींना 1 लाख कोटींहून अधिक किमतीची कंत्राट दिली. कर जनतेकडून घेतला, कर्जमाफी मात्र उद्योपतींना दिली. मोदी सरकारने आतापर्यंत उद्योगपतींचे 60 लाख कोटींचे कर्ज माफ केले, असा आरोप राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर आरोप केला.

काय म्हणाल्या प्रियांका गांधी?

प्रियांका गांधी म्हणाल्या, न्यायाची लढाई लढण्यासारखी कोणतीही मोठी देशभक्ती नाही. आज आपल्या देशात सगळीकडे अन्याय होत आहे. गरिबांवर अडचणी येत आहेत आणि मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ होत आहेत. असे कायदे केले जातात ज्याद्वारे लाखो लोक कैद्यासारखे ठेवले जातात. आजच्या या लढाईत उभा न राहणाऱ्याला भ्याड म्हटले जाईल. देशाचे रक्षण करणे, स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचा हक्क असणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी माझे काँग्रेसचे कार्यकर्ते भाऊ-बहिणी आहेत. देशाला वाचवण्यासाठी ही भावना घेऊन आले आहेत, त्याबद्दल प्रियांका यांनी जनतेचे आभार मानले.

Published by: Sandip Parolekar
First published: December 14, 2019, 1:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading