कुठलीही चौकशी करा पण भैय्यूजींच्या आत्महत्येचं कारण शोधा - कुहू

' महाराज हे खंबीर होते. त्यांनी का असा निर्णय घेतला तो आम्हालाही अनाकलनीय आहे.'

News18 Lokmat | Updated On: Dec 20, 2018 06:24 PM IST

कुठलीही चौकशी करा पण भैय्यूजींच्या आत्महत्येचं कारण शोधा - कुहू

इंदूर, 20 डिसेंबर : आध्यात्मिक गुरू भैय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येचं गूढ आणखी वाढलं आहे. भैय्यूजी महाराज यांनी नेमकी कुठल्या कारणांमुळे आत्महत्या केली हे आम्हालाही कळालेलं नाही. कुठल्याही संस्थेमार्फेत चौकशी करा पण त्यांच कारण आम्हाला कळू द्या अशी मागणी महाराजांच्या कन्या कुहू यांनी केलीय. आत्महत्येमागे आर्थिक आणि कौटुंबिक कारणं असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर कुहूने ही मागणी केलीय.


आध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणाला मंगळवारी नवं वळण मिळालं होतं. भय्यू महाराज यांचा जुन्या ड्रायव्हरला पोलिसांनी अटक केली होती. त्याची चौकशी केली असता त्याने भय्यू महाराजांच्या वकिलांकडे 5 कोटींची खंडणी मागण्यासाठी कट रचला होता अशी कबूली दिली होती.


एका वहिनीला मुलाखत देताना कुहू म्हणाली महाराज हे खंबीर होते. त्यांनी का असा निर्णय घेतला तो आम्हालाही अनाकलनीय आहे. जे आरोप होत आहेत त्याविषयी काहीही बोलणार नाही असंही तीने स्पष्ट केलं.

Loading...

भय्यू महाराज आणि त्यांची पत्नी डॉ. आयुषी यांच्या वकिलाला 5 कोटी खंडणी मागणाऱ्या टोळीला इंदूर पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी जेव्हा या टोळीची चौकशी केली तेव्हा त्यांनी धक्कादायक माहिती दिली.


भय्यू महाराज यांचा जुना ड्रायव्हर कैलास या प्रकरणात सहभागी आहे. त्यानेच खंडणी मागण्यासाठी कट रचला होता. भय्यू महाराज यांच्या वकिलाकडे कोट्यवधी रूपये असल्याचा त्याला संशय होता.


भय्यू महाराज यांचा विश्वासू सेवक विनायक हा 12 कोटी रूपये घेऊन फरार झाला अशी माहितीही कैलासनं दिली होती. विनायकनं या प्रकरणाची कुठेही वाच्यात होऊ नये म्हणून मला 2 कोटी रूपये देण्याचं आश्वासन दिलं होतं असंही  त्यानं सांगितलं होतं. त्याच्या माहितीच्या आधारावरून पोलीस आता विनायकचा शोध घेत आहेत.


 


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 20, 2018 06:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...