भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा; महत्त्वाचा पुरावा समोर

भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा; महत्त्वाचा पुरावा समोर

भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात आता पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा लागला आहे.

  • Share this:

इंदूर, 19 मार्च : भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात आता महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. 12 जून 2018 रोजी भैय्यू महाराज यांनी गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली. यामध्ये अनेक दावे - प्रतिदावे केले गेले. पण, आता एसएसपी रूचिवर्धन मिश्र यांनी सर्वात मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी भैय्यू महाराज यांनी औषधांच्या नशेत सुसाईड नोट लिहिली होती.

त्याचे सेवक विनायक आणि शरद त्यांना बलात्काराच्या गुन्ह्यात फसवण्याची धमकी देत होते. त्यामुळे अखेर या धमकीला कंटाळून भैय्यू महाराज यांनी आत्महत्या केल्याचं आता समोर आलं आहे. इंदूरचे एसएसपी रूचिवर्धन मिश्र यांनी याबाबती माहिती दिली.

याप्रकरणात आता आरोपींकडून ब्लॅक चेक जप्त करण्यात आले असून न्यायालयात हा महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. विनायक आणि शरद यांची भैय्यू महाराज यांची संपत्ती हडप करण्याचा आणि ट्रस्टवर ताबा मिळवण्याची योजना होती. दरम्यान, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये भैय्यू महाराज यांनी संपत्तीची जबाबदारी ही विनायक याची राहिल असं म्हटलं होतं.

'राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडणार',DMKच्या जाहीरनाम्यानं खळबळ

डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

आध्यात्मिक गुरू भैय्यू महाराज यांनी 12 मार्च 2018 रोजी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांना इंदूरच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला होता. ते 50 वर्षांचे होते.

आत्महत्येपूर्वी भैय्यू महाराज गेल्या काही दिवसांपासून निराशेच्या अवस्थेत होते अशीही माहिती होती. त्यावेळी त्यांनी निराशेतूनच आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात होता. मध्यप्रदेश सरकारनं राज्यातल्या विविध संत मंडळींना मंत्रीपदाचा दर्जा दिला होता त्यात भैय्यू महाराज यांचाही समावेश होता.

मॉडेलिंग ते आध्यात्मिक गुरू असा त्यांचा चढता आलेख होता. 1968 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. सर्वच पक्षांमधल्या राजकारण्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते. विविध आंदोलनांमध्ये मध्यस्त्याची भूमिकाही त्यांनी निभावली होती.

धावती ट्रेन पकडताना युवकाचा पाय घसरला; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

First published: March 19, 2019, 2:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading