भय्यू महाराजांना जाळ्यात अडकवणारी पलक पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर!

भय्यू महाराजांना जाळ्यात अडकवणारी पलक पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर!

पलक या महिलेने महाराजांची जवळी साधली आणि त्यांना जाळ्यात अडकवले. कोण आहे ही पलक आणि कशा पद्धतीने तिने भय्यू महाराजांचा मानसिक छळ केला जाणून घेऊयात...

  • Share this:

इंदोर, 19 जानेवारी: भय्यू महाराज आत्महत्याप्रकरणी पलक पुराणिक या महिलेसह दोघांना पोलिसांनी अटक केली. महाराजांच्या आत्महत्या प्रकरणात अचानक समोर आलेल्या पलक या महिलेने महाराजांची जवळीक साधली आणि त्यांना जाळ्यात अडकवले. कोण आहे ही पलक आणि कशा पद्धतीने तिने भय्यू महाराजांचा मानसिक छळ केला जाणून घेऊयात...

अशा प्रकारे झाली पलकची एन्टी

भय्यू महाराजांची पहिली पत्नी माधवी यांच्या निधनानंतर पलक केअर टेकर म्हणून त्यांच्या आयुष्यात आली. महाराजांच्या एकटेपणाचा फायदा घेत तिने प्रेम संबंध निर्माण केले. पलक महाराजांच्या बेडरूममध्ये राहत. त्यांचे कपडे तिच कपाटात ठेवत असे. त्यानंतर तिने महाराजांचा अश्लील व्हिडिओ तयार केला. इतक नव्हे तर वॉट्सएपवर अश्लील चॅटकरुन ते सेव्ह करायची.

संबंधित बातमी: भय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: 125 जणांची चौकशी, 25 जणांचा जबाब... असे आले सत्य समोर!

यात महाराजांनी 17 एप्रिल 2017 रोजी आयुषी यांच्याशी विवाह केला. याची माहिती कळताच पलकने लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. महाराजांनी लग्नासाठी नकार दिला. त्यावर, मी तुम्हाला लग्न करण्यासाठी एक वर्षाचा मुदत देते अशी धमकी तिने दिली होती. त्यानंतरच्या काळात तिने कपडे, दागिने आणि मोबाईलसाठी 25 लाख रुपये घेतले.

तुमचा दाती महाराज करू

पलकने महाराजांना लग्नासाठी दिलेली मुदत जून महिन्यात संपणार होती. 16 जून रोजी लग्न न केल्यास दाती महाराजांसारखे हाल करू अशी धमकी तिने दिली होती. पण त्याच्या 4 दिवस आधीच भय्यू महाराजांनी गोळ्या घालून आत्महत्या केली.

VIDEO : ...तर तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख

First published: January 19, 2019, 3:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading