आध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांना ब्लॅकमेल करण्याचा एका तरुणीवर आरोप आहे. या महिलेला शुक्रवारी (18 जानेवारी 2019) पोलिसांनी अटकही केली. ड्रायव्हर कैलास पाटीलनेच हा आरोप केला होता. त्याच्या आरोपांमुळे त्या वेळी एकच खळबळ उडाली होती. अखेर ही तरुणी डिसेंबरमध्ये पोलिसांसमोर आली. या तरुणीची पोलिसांनी चौकशी केली. त्यामुळे या प्रकरणातलं वाढलेलं गूढ आता या प्रकरणी झालेल्या 3 जणांच्या अटकेमुळे उकलेल अशी अपेक्षा आहे. पोलिसांच्या चौकशीसाठी जाताना या महिलेला News18 च्या कॅमेऱ्याने कैद केलं होतं तो हा व्हिडिओ...