भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, तरुणीच्या चौकशीने गुढ वाढलं

'एक युवती त्यांच्याकडे 40 कोटी रुपये, मुंबई चार बीएचके चा फ्लॅट, 40 लाखांची कार आणि नौकरीची मागणी करत होती'

News18 Lokmat | Updated On: Dec 30, 2018 08:59 PM IST

भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, तरुणीच्या चौकशीने गुढ वाढलं

विकास सिंग चौहान, इंदूर 30 डिसेंबर : आध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणाला रविवारी नवं मिळालं. या प्रकरणी पोलिसांनी एका तरूणीची चौकशी केली आहे. त्या तरूणीने जी माहिती दिली त्यामुळे या प्रकरणातलं गुढ वाढण्याची शक्यता आहे. ही तरुणी महाराजांना ब्लॅकमेल करत होती असा आरोप आहे.


भय्यूजी महाराजांच्या आत्महत्येला सहा महिने उलटून गेले मात्र अजुनही आत्महत्येचं खरं कारण पुढं आलेलं नाही. या प्रकरणी रविवारी इंदूर पोलिसांनी एका संशयीत तरुणीची दिवसभर चौकशी केली. या चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे.  ही तरुणी आणि महाराजांचा विश्वासू सेवक विनायक दुधाळे याच्या माहितीमध्ये फरक असल्याचं पोलिसांना आढळून आलंय.


त्यामुळं सोमवारीही त्या तरुणीला चौकशीसाठी पोलिसांनी बोलावलं आहे. रविवारच्या चौकशीनंतर तिला सोडून देण्यात आलं. संशय वाढल्याने पोलीस तिची आणि विनायकची समोरासोर बसून चौकशी करणार आहेत.

Loading...


काय होते आरोप?

काही दिवसांपूर्वीच महाराजांच्या ड्रायव्हरला पाच कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या चौकशीत त्याने सांगितले होते की एक युवती त्यांच्याकडे 40 कोटी रुपये, मुंबई चार बीएचके चा फ्लॅट, 40 लाखांची कार आणि स्वत:साठी मोठ्या पदाची नौकरी अशी मागणी करत होती. या कटात महाराजांचे दोन सेवादारही सहभागी असल्याचा संशय आहे.


काय आहे प्रकरण?


पन्नास वर्षांच्या भय्यू महाराजांनी 12 जूनला आपल्या निवासस्थानी गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. हे आत्महत्येचं प्रकरण आहे असं समजून पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर प्रकरण बंद करण्याची तयारी केली होती. मात्र त्यांचा ड्रायव्हर कैलास पाटील उर्फ भाऊ याला निवेश बडजात्या या वकिलांकडे पाच कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली. त्याने चौकशीद अनेक गौप्यस्फोट केले. आश्रमातले काही लोक महाराजांना ब्लॅकमेल करत होते अशी माहिती त्याने पोलिसांना दिली होती.




बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 30, 2018 08:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...