भय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: पलकने तयार केला होता अश्लील व्हिडिओ!

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: पलकने तयार केला होता अश्लील व्हिडिओ!

भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्यापैकी पलकने त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • Share this:

इंदोर, १९ जानेवारी:  भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्यापैकी पलकने त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित युवतीने भय्यू महाराजांवर लग्नासाठी दबाव टाकला होता. लग्न न केल्यास दाती महाराजांप्रमाणे तुमच्यावर गुन्हा दाखल करु अशी धमकी तिने दिली होती.

आध्यात्मिक गुरू भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी शुक्रवारी विनायक दुधाडे, शरद देशमुख आणि पलक या तरुणीला अटक केली .संबंधित तरुणीने लग्नासाठी भय्यू महाराजांवर दबाव टाकला होता.त्यासाठी तिने एक वर्षाचा अल्टिमेटम दिला होता.

एक वर्षाचा अल्टिमेटम

पलकने लग्नकरण्यासाठी भय्यू महाराजांना एक वर्षाचा अल्टिमेटम दिला होता. त्याची मुदत १६ जूनला संपणार होती. त्याआधीच १२ जून रोजी भय्यू महाराजांनी आत्महत्या केली.

कोण होती पलक

भय्यू महाराजांची पहिली पत्नी माधवी यांच्या निधनानंतर पलक केअर टेकर म्हणून आली होती. महाराजांच्या एकटेपणाचा फायदा घेत तिने प्रेम संबंध निर्माण केले. तिनेच महाराजांचा अश्लील व्हिडिओ तयार केला. इतक नव्हे तर वॉट्सएपवर अश्लील चॅटकरुन ते सेव्ह करायची. यात महाराजांनी १७ एप्रिल २०१७ रोजी आयुषी यांच्याशी विवाह केला. याची माहिती कळताच पलकने लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. महाराजांनी लग्नासाठी नकार दिला. त्यावर, मी तुम्हाला लग्न करण्यासाठी एक वर्षाचा मुदत देते अशी धमकी तिने दिली होती. त्यानंतरच्या काळात तिने कपडे, दागिने आणि मोबाईलसाठी २५ लाख रुपये घेतले होते. पलकने दिलेली मुदत जून महिन्यात संपणार होती. १६ जून रोजी लग्न न केल्यास दाती महाराजांसारखे हाल करू अशी धमकी तिने दिली होती.

मास्टरमाईड विनायक आणि शरद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करण्याचा प्लॅन विनायक आणि शरद यांचा होता. यासाठी त्यांनी पलकचा वापर करुन घेतला. विनायक महाराजांवर दबाव टाकण्याचे काम करत असे. पलक तुमच्यावर शोषणाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहे. यासाठी तो महिन्याला लाखो रुपये महाराजांकडून घेत असे. विनायक आणि पलक दोघे महाराजांना अशक्त होणाऱ्या गोळ्या देत असल्याचे समोर आले आहे.

महाराज-पलक यांचे वॉट्सएपवरील अश्लील चॅट

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भय्यू महाराज यांच्या दुसऱ्या विवाहाच्या आधी विनायक आणि शरद यांनी पलकला सिल्व्हर स्प्रिंग येथील घरी बोलवले. त्यांनी पलक व महराजांच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर केला. त्यात अश्लील चॅट मिळाले होते.

VIDEO : गुर्हाळ घराच्या काहिलीत कर्मचाऱ्याने मारली उडी

First published: January 19, 2019, 12:29 PM IST

ताज्या बातम्या