भय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: 125 जणांची चौकशी, 25 जणांचा जबाब... असे आले सत्य समोर!

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: 125 जणांची चौकशी, 25 जणांचा जबाब... असे आले सत्य समोर!

आध्यात्मिक गुरू भय्यू महाराज आत्महत्याप्रकरणी नवे धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. राजस्थानमधील दाती महाराजांप्रमाणे आपली बदनामी केली जाईल अशी भिती भय्यू महाराजांना होती.

  • Share this:

इंदोर, 19 जानेवारी: आध्यात्मिक गुरू भय्यू महाराज आत्महत्याप्रकरणी नवे धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. राजस्थानमधील दाती महाराजांप्रमाणे आपली बदनामी केली जाईल अशी भिती भय्यू महाराजांना होती. ही बातमी त्यांनी 8 तास पाहिल्याचे मध्य प्रदेशचे डीआयजी हरिनारायणचारी मिश्र यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. या प्रकरणी काल (शुक्रवारी) अटक करण्यात आलेल्या तिघांनी त्यांच्यावर मानसिक दबाव टाकल्याचे पुरावे मिळाल्याचे मिश्र म्हणाले.

संबंधित बातमी: भय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: पलकने तयार केला होता अश्लील व्हिडिओ!

भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी 125 जणांची चौकशी तर 28 जणांचा जबाब नोंदवल्यानंतर अटकेची कारवाई केल्याचे मिश्र म्हणाले. अटक करण्यात आलेल्या विनायक दुधाडे, शरद देशमुख आणि पलक या तिघांनी महाराजांकडून पैसे घेतल्याचे पुरावे मिळाले आहेत. विनायक आणि शरद हे पलकला महाराजांवर दबाव टाकण्यासाठी प्रोत्साहन देत. पलकने एका वर्षात लग्न न केल्यास तुमचा देखील दाती महाराज करू अशी धमकी भय्यू महाराजांना दिली होती.

या प्रकरणी महाराजांच्या जवळच्या लोकांचा जबाब नोंदवल्यानंतर अनेक गोष्टींची उलघडा झाला. तसेच काही डीजिटल पुरावे देखील पोलिसांना मिळाले आहेत. संबंधित महिले सोबतचे चॅट देखील पोलिसांनी रिकव्हर केले आहेत. या तिघांच्या चॅटमधून महाराजांकडून खंडणी मागितल्याचे स्पष्ट होते, असे मिश्र म्हणाले. सध्या पोलिसांना मिळालेल्या पुराव्यानुसार भय्यू महाराजांवर दबाव टाकून खंडणी घेण्याचा या तिघांचा कट होता मिश्र यांनी सांगितले.

औषधांचे कव्हर बदलून दिल्या गोळ्या

भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणातील सर्वात धक्कादायक खुलासा म्हणजे विनायक आणि शरद यांनी औषधांचे कव्हर बदलून महाराजांना गोळ्या दिल्या होत्या. ज्या गोळ्या द्यायच्या नव्हत्या त्या देताना संशय येऊ नये म्हणून त्याचे कव्हर बदलले जायचे, असे मिश्र यांनी सांगितले. या औषधांचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला. शारिरीक क्षमता कमी करणारी ही औषधे होती, असे मिश्र म्हणाले.

VIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं

First published: January 19, 2019, 2:14 PM IST

ताज्या बातम्या