समाज तोडणाऱ्या जातीय राजकारणाला संघाचा विरोध - भैय्याजी जोशी

समाज तोडणाऱ्या जातीय राजकारणाला संघाचा विरोध - भैय्याजी जोशी

जाती आणि धर्माच्या नावावर सध्या होत असलेल्या राजकारणावर संघाने तीव्र चिंता व्यक्त केलीय. याबाबत वाटणारी काळजी संघाने केंद्र सरकारच्या कानावर घातली आहे.

  • Share this:

मुंबई, ता.6 सप्टेंबर : जाती आणि धर्माच्या नावावर सध्या होत असलेल्या राजकारणावर संघाने तीव्र चिंता व्यक्त केलीय. अशा राजकारणामुळं सामाजिक समरसता नष्ट होतेय. याबाबत वाटणारी काळजी संघाने केंद्र सरकारच्या कानावर घातली असल्याची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केली. न्यूज18 इंडियाशी बोलताना त्यांनी ही चिंता व्यक्त केलीय. देशभर सध्या जाती-पाती आणि धर्माच्या नावावर राजकारण सुरू आहे. त्यामुळं समाजाची वीण उसवली जातेय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जाती-पाती आणि धर्माच्या राजकारणाला कायम विरोध आहे.

संघाला तोडण्याचं नाही तर जोडण्याचं काम करायचं आहे असंही जोशी यांनी सांगितलं. सामाजिक समरसता वाढवण्यासाठी संघ संस्कार भारतीच्या पुढाकाराने देशभर सांस्कृतिक कुंभाचं आयोजन करत आहे. या कार्यक्रमात सर्व जाती-धर्मातल्या मान्यवरांना आमंत्रित करण्यात येत आहे. अशाच पद्धतीचा कार्यक्रम बुधवारी मुंबईत करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला जोशी उपस्थित होते.

भैय्याजी जोशी म्हणाले संघाचा अखंड भारत आणि हिंदुत्वाचा अजेंडा पूर्ण होऊ नये यासाठी काही लोक जातीय राजकारणाला प्रोत्साहन देत आहेत. मात्र हा अजेंडा कधीच यशस्वी होणार नाही. अयोध्येत राम मंदिर होणारच असून त्याच्या मार्गातले अडथळे सरकारने दूर केले पाहिजे. ती जबाबदारी सरकारची आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

भैय्याजी जोशी यांच्या या वक्तव्यामुळं सरकारवरचा दबाव वाढणार आहे. काही मंडळी समाजात फुट पाडण्यासाठी नकारात्मकता वाढवण्याचा काम करताहेत. संघाचा या गोष्टीला कायम विरोध आहे.

आगामी कुंभ मेळ्यात संस्कार भारती अनेक कार्यक्रमांचं आयोजन करणार आहे. यात संगीत आणि सांस्कृतिक नाटकांचा समावेश असेल. संस्कार भारती ही संघ परिवारातली मुख्य संघटना आहे.

VIDEO : अकोला जिल्हाधिकाऱ्यांची 'मुन्ना भाई' स्टाईल गांधीगिरी!

First published: September 6, 2018, 10:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading