Home /News /national /

राम-कृष्णाची भजन करणाऱ्या मुस्लिम मुन्ना मास्टर यांना 'पद्मश्री'

राम-कृष्णाची भजन करणाऱ्या मुस्लिम मुन्ना मास्टर यांना 'पद्मश्री'

भजन गाणाऱे मुन्ना मास्टर हे एका मुस्लिम कुटुंबातील असून त्यांची चारही मुलं संस्कृत शाळेत शिकली. त्यांच्या एका मुलीचा जन्म दिवाळीला झाला म्हणून तिचं नाव लक्ष्मी असं ठेवलं आहे.

    जयपूर, 26 जानेवारी : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने 'पद्मश्री' पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रातील 3 जणांसह देशातील एकूण 22 जणांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. यामध्ये हिंदु-मुस्लीम बंधुभावाची शिकवण देणाऱ्या आणि सौहार्द निर्माण करणाऱ्या मुन्ना मास्टर यांच्याही नावाचा समावेश आहे. भजन गाणाऱे मुन्ना मास्टर हे एका मुस्लीम कुटुंबातील आहेत.  जयपूरचे असलेल्या मुन्ना मास्टर यांनी त्यांच्या कुटुंबीयांची राम-कृष्ण भजने गाण्याची परंपरा कायम ठेवली आहे. कृष्णाची भजने गाणाऱ्या या अवलियाने श्री श्याम सुरभी वंदना नावाचं पुस्तकही लिहिलं आहे. भारताच्या सर्वधर्म समभावाचे दर्शन त्यांनी कृतीतून दाखवून दिलं आहे. ते नमाज पठणही करतात आणि भजनसुद्दा गातात. संस्कृत भाषेचा त्यांचा अभ्यास आहे. तसंच मुन्ना मास्टर गोपालनही करतात. मुन्ना मास्टर यांचे खरे नाव रमजान खान असं आहे. दिवसाची सुरुवात कृष्णाच्या भजनांनी आणि गाईच्या पुजेने करणाऱ्या मुन्ना मास्टर यांचे संपूर्ण कुटुंब संस्कृतचा अभ्यास करते. त्यांच्या मुलाने संस्कृतमध्ये डॉक्टरेटही मिळवली आहे. त्यांची चारही मुले संस्कृत विद्यालयात शिकली आहेत. तसंच त्यांच्या लहान मुलीचा जन्म दिवाळीच्या दिवशी झाल्यानं तिचं नाव लक्ष्मी आणि मोठ्या मुलीचं नाव अनिता ठेवलं आहे. वाचा : पद्म पुरस्कारांची घोषणा, राहीबाई पोपेरे, पोपटराव पवार 'पद्मश्री'चे मानकरी मुन्ना मास्टर यांचे वडील संगीत विशारद मास्टर गफूर खान हे गोभक्त होते. मुन्ना मास्टर यांना सुंदरकांड, हनुमान चालिसा यासह अनेख भजने मुखोद्गत आहेत. अनेक तास ते गाईंची सेवा करण्यात घालवतात. त्यांच्या घराच्या भिंतीवरही कृष्णाचे फोटो आहेत. वाचा : 'पद्मश्री' राहीबाई पोपेरे यांनी संकटांवर मात करून उभारली 'बीज बँक'
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: India, Padma Shri, Republic Day

    पुढील बातम्या