Home /News /national /

आणखी एक काका-पुतण्या राजकारणात आमने सामने; काकांना मंत्री केलंत तर.... पुतण्याची थेट मोदींना धमकी

आणखी एक काका-पुतण्या राजकारणात आमने सामने; काकांना मंत्री केलंत तर.... पुतण्याची थेट मोदींना धमकी

लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देत आपले चुलते आणि बंडखोर खासदार पशुपती पारस यांना मंत्रीपद न देण्याची ताकीद दिली आहे.

    नवी दिल्ली, 6 जुलै : लोकजनशक्ती पक्षाचे (LJP) नेते चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) आव्हान देत आपले चुलते आणि बंडखोर खासदार पशुपती पारस (Pashupati Paras) यांना मंत्रीपद न देण्याची ताकीद दिली आहे. पारस यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेतलं, तर आपण न्यायालयात जाऊ असं सांगत कायदेशीर कारवाईचा (Legal Action) इशारा दिला आहे. आपण पक्षाचे अध्यक्ष असून पक्षातून हकालपट्टी केलेल्या उमेदवाराला मंत्रीपद देणं योग्य नसल्याचं चिराग पासवान यांनी म्हटलं आहे. काका-पुतण्या वाद चिराग पासवान यांच्या अपरोक्ष पक्षातील सहापैकी पाच खासदारांना एकत्र करत पशुपती पारस यांनी बंडाचा पवित्रा घेतला होता. बिहार विधानसभेपूर्वी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय चिराग पासवान यांनी घेतला होता. त्याला आव्हान देत पुन्हा पक्षाला एनडीएसोबत घेऊन जाण्याचा निर्णय पारस यांनी जाहीर केला होता. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी पारस यांच्या हकालपट्टीची घोषणा केली होती. हे वाचा -मोदींचा असाही मास्टरस्ट्रोक, सेनेला डिवचत अवजड खाते राणेंना मिळणार? मोदी असं करणार नाहीत – चिराग पक्षातून हाकलून दिलेल्या नेत्याला मोदी मंत्रिमंडळात सहभागी करून घेणार नाहीत, असा विश्वासही चिराग पासवान यांनी व्यक्त केला आहे. मात्र तसं घडलंच, तर कायदेशीर लढाईसाठी आपण सज्ज असल्याचं पासवान यांनी म्हटलं आहे. आपले वडिल रामविलास पासवान यांच्या विचारांशी दगा करून पक्षात फूट पाडणाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली असून पक्षाचं प्राथमिक सदस्यत्वही रद्द करण्यात आल्याचं चिराग यांनी म्हटलं आहे. याची कल्पना निवडणूक आयोगालाही देण्यात आल्याचं ते म्हणाले. पशुपती पारस यांना जेडीयुत प्रवेश द्या आणि मग त्यांना मंत्री करा, पण लोकजनशक्ती पक्षाच्या नावाने त्यांना मंत्री करणे चुकीचे आहे, असं पासवान यांनी म्हटलं आहे. बदललेली समीकरणे रामविलास पासवान यांच्या निधनानंतर पक्षाची प्रतिमा बदलण्यासाठी एनडीएतून बाहेर पडून स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय चिराग पासवान यांनी घेतला होता. त्यानंतर 14 जून रोजी पाच खासदारांनी एकत्र येत एनडीएला समर्थन असल्याचं जाहीर केलं होतं. तर 17 जून रोजी पारस गटाच्या बैठकीत पशुपती पारस यांना पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष जाहीर करण्यात आलं होतं.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Bihar, Union cabinet

    पुढील बातम्या