डिसेंबर महिन्यात फिरण्यासाठी ही सगळ्यात बेस्ट 5 ठिकाणं मिस करू नका!

डिसेंबर महिन्यात फिरण्यासाठी ही सगळ्यात बेस्ट 5 ठिकाणं मिस करू नका!

उंच टेकडीवर वसलेलं इथलं छोटसं शहर फार प्रसिद्ध आहे.

  • Share this:

गोव्यात तर तसं वर्षभरात कधीही जाऊ शकतो. पण, डिसेंबर महिन्यात गोव्यात फिरण्याची काही वेगळीच मजा असते. रात्रभर चालणाऱ्या पार्ट्या, कसिनो, हवेत थंडावा आणि बीच यामुळे तुमची ही सुट्टी आयुष्यभर तुमच्या लक्षात राहील यात काही वाद नाही. गोव्यात तर तसं वर्षभरात कधीही जाऊ शकतो. पण, डिसेंबर महिन्यात गोव्यात फिरण्याची काही वेगळीच मजा असते. रात्रभर चालणाऱ्या पार्ट्या, कसिनो, हवेत थंडावा आणि बीच यामुळे तुमची ही सुट्टी आयुष्यभर तुमच्या लक्षात राहील यात काही वाद नाही.

देशभरात अशी अनेक पर्यटन स्थळं आहेत. पण राजस्थानची गोष्ट काही औरच आहे. राजेशाही थाट, उंटावरची सफर, ऐतिहासिक वास्तू पाहणं हा एक वेगळाच अनुभव आहे. राजस्थानमधली थंडीही थोडी वेगळी असते. त्यामुळे थंडीत ऐतिहासिक वास्तू पाहण्याची मज्जाच काही वेगळी असेल. देशभरात अशी अनेक पर्यटन स्थळं आहेत. पण राजस्थानची गोष्ट काही औरच आहे. राजेशाही थाट, उंटावरची सफर, ऐतिहासिक वास्तू पाहणं हा एक वेगळाच अनुभव आहे. राजस्थानमधली थंडीही थोडी वेगळी असते. त्यामुळे थंडीत ऐतिहासिक वास्तू पाहण्याची मज्जाच काही वेगळी असेल.

भारताची राजधानी दिल्ली हे पर्यटकांचं केंद्र बिंदू आहे. थंडीच्या दिवसांत जगभरातले पर्यटक खास थंडीत दिल्लीत येतात. इथे लोक संस्कृती, कला आणि नैसर्गिक सौंदर्य पाहायला येतात. भव्य आणि अतिशय सुंदर उद्यानं आणि ऐतिहासिक वास्तूंसाठी दिल्ली ओळखली जाते. भारताची राजधानी दिल्ली हे पर्यटकांचं केंद्र बिंदू आहे. थंडीच्या दिवसांत जगभरातले पर्यटक खास थंडीत दिल्लीत येतात. इथे लोक संस्कृती, कला आणि नैसर्गिक सौंदर्य पाहायला येतात. भव्य आणि अतिशय सुंदर उद्यानं आणि ऐतिहासिक वास्तूंसाठी दिल्ली ओळखली जाते.

हिवाळ्यात संपूर्ण हिमाचल प्रदेश हे राज्यचं पाहण्यासारखं असतं. पण, पूर्ण राज्य फिरता येणं शक्य नसलं तरी मनालीला नक्की जाऊ शकता. मनालीला रंगीबेरंगी फुलांचं खोरंही म्हटलं जातं. इथे लोकं बर्फाने आच्छादलेले पर्वत, देवदार झाडं आणि अलौकिक नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी येतात. हिवाळ्यात संपूर्ण हिमाचल प्रदेश हे राज्यचं पाहण्यासारखं असतं. पण, पूर्ण राज्य फिरता येणं शक्य नसलं तरी मनालीला नक्की जाऊ शकता. मनालीला रंगीबेरंगी फुलांचं खोरंही म्हटलं जातं. इथे लोकं बर्फाने आच्छादलेले पर्वत, देवदार झाडं आणि अलौकिक नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी येतात.

या महिन्यात शिलाँगलाही तुम्ही भेट देऊ शकता. इथे सर्वात सुंदर अशी डोंगरात स्टेशन आहे. उंच टेकडीवर वसलेलं इथलं छोटसं शहर फार प्रसिद्ध आहे. शिलाँगमध्ये अनेक सुंदर स्पॉट आहेत. यात वार्डस लेक, उमियाम झील, पोलो ग्राऊंड, मिनी चिडीया घर, हाथी झरना आणि शिलाँगमधील पर्वत रांगा प्रसिद्ध आहेत. या महिन्यात शिलाँगलाही तुम्ही भेट देऊ शकता. इथे सर्वात सुंदर अशी डोंगरात स्टेशन आहे. उंच टेकडीवर वसलेलं इथलं छोटसं शहर फार प्रसिद्ध आहे. शिलाँगमध्ये अनेक सुंदर स्पॉट आहेत. यात वार्डस लेक, उमियाम झील, पोलो ग्राऊंड, मिनी चिडीया घर, हाथी झरना आणि शिलाँगमधील पर्वत रांगा प्रसिद्ध आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 18, 2019 09:22 AM IST

ताज्या बातम्या