मराठी बातम्या /बातम्या /देश /

'त्यांनी मला चपलेनं मारलं आणि... ', Zomato बॉयचा अटकेनंतर धक्कादायक खुलासा!

'त्यांनी मला चपलेनं मारलं आणि... ', Zomato बॉयचा अटकेनंतर धक्कादायक खुलासा!

ऑर्डर उशीरा (order delay) आल्याच्या वादातून झोमॅटो कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने (Zomato delivery boy) आपल्याला मारहाण केली असा दावा  बंगळुरुतील हितेशा चंद्राणी (Hitesha Chandranee) या महिलेनं केला होता. या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

बंगळुरु, 12 मार्च : ऑर्डर उशिरा (order delay) आल्याच्या वादातून झोमॅटो कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने (Zomato delivery boy) आपल्याला मारहाण केली असा दावा बंगळुरुतील हितेशा चंद्राणी (Hitesha Chandranee) या महिलेनं केला होता. या महिलेनं रक्तबंबाळ अवस्थेतील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. तो व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर संबंधित महिलेच्या तक्रारीवरुन कामराज या झोमेटो डिलिव्हरी बॉयला अटक देखील झाली. या अटकेनंतर घडलेल्या प्रकरणाबाबत कामराजने धक्कादायक खुलासा केला आहे.

'द न्यूज मायनूट' या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, कामराजने दिलेल्या जबानीमध्ये त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. हितेशा चंद्राणी यांच्या घरी मी उशिरा पोहचलो. खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे मी उशिरा पोहचलो असं सांगून त्यांची माफी मागितली. त्यांनी (हितेशा) कॅश ऑन डिलिव्हरी (cash on delivery) हा पर्याय निवडल्याने मी त्यांच्याकडे पैसे देण्याची मागणी केली. मात्र त्यावेळी हितेशा यांनी जेवण ताब्यात घेतलं, पण आपण कस्टमर सपोर्टशी बोलत असल्याचं सांगून पैसे देण्यास नकार दिला,' असं कामराज यांनी सांगितलं.

'त्यानंतर हितेशा अचानक जोरात ओरडायला आणि शिव्या द्यायला लागल्या. कस्टमर सपोर्टने मला ऑर्डर कॅन्सल झाल्याचं सांगून पार्सल परत घेण्याची सूचना केली होती. त्यांनी पार्सल देण्यास नकार दिला. मी त्या ठिकाणचं एकूण वातावरण पाहून पार्सल न घेता परत जाण्याचं ठरवलं,' असा अनुभव कामराजने सांगितला आहे.

(वाचा - VIDEO:खोकणं, शिवीगाळ, गैरवर्तन..कॅब ड्रायव्हरनं मास्क घाला सांगताच महिलांचा राडा)

'... म्हणून नाक फुटलं'

हितेशा चंद्राणी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांचं नाक फुटलेलं दिसत आहे. ते नाक का फुटलं याबाबतही कामराजने खुलासा केला आहे. 'मी परत निघालो त्यावेळी देखील त्या ओरडत होत्या. त्यांनी अचानक माझ्यावर चप्पल भिरकावली आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. मी मारहाणीपासून वाचण्यासाठी हात पुढे केला होता. यावेळी त्यांनी चुकून त्यांचाच हात स्वत:च्या नाकावर मारला. त्यांच्या बोटाची अंगठी नाकाला लागली आणि नाकातून रक्त यायला लागलं.' असा दावा कामराजने केला आहे.

'झोमॅटो डिलिव्हरी बॉयने नाक फोडलं' रक्तबंबाळ अवस्थेत महिलेचा आरोप Viral Video )

संपूर्ण प्रकरणाला नवं वळण

कामराज यांनी केलेल्या दाव्यानंतर या संपूर्ण मारहाण प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. हितेशा चंद्राणी यांच्या तक्रारीनंतर झोमॅटो कंपनीने कामराजला कामावरुन निलंबित केलं होतं. आता कंपनीने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, म्हणून कामराज आणि हितेशा या दोघांनाही कायदेशीर मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

First published:

Tags: Bengaluru, Zomato