Home /News /national /

लॉकडाऊनमध्ये अंघोळ न करता वारंवार सेक्सची मागणी, महिलेची नवऱ्याविरोधात पोलिसात तक्रार

लॉकडाऊनमध्ये अंघोळ न करता वारंवार सेक्सची मागणी, महिलेची नवऱ्याविरोधात पोलिसात तक्रार

बेंगळुरूमधील एका महिलेने तिच्या पतीवर असा आरोप केला आहे की, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून त्याने अंघोळच केलेली नाही आणि तो वारंवार शरीरसंबध ठेवण्यासाठी तिच्यावर दबाव आणतो आहे.

    बंगळुरू, 20 एप्रिल : लॉकडाऊनच्या काळात जगभरातून घरगुती हिंसाचाराच्या घटना वाढल्याच्या बातम्या येत आहेत. पोलिसांच्या हेल्पलाइनवर अनेक स्रियांनी तक्रार केली आहे. पतीविरोधात अनेक महिलांनी धैर्य दाखवत तक्रार नोंदवली आहे. दरम्यान बेंगळुरूमधील एका महिलेने तिच्या पतीवर असा आरोप केला आहे की, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून त्याने अंघोळच केलेली नाही आणि तो वारंवार शरीरसंबध ठेवण्यासाठी तिच्यावर दबाव आणतो आहे. (हे वाचा-चोरीच्या संशयाखाली पकडलेला तरुण निघाला कोरोना पॉझिटिव्ह, पोलीस ठाण्यात खळबळ) टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार या दोन मुलांची आई असणाऱ्या 31 वर्षांच्या महिलेने तिच्या पतीविरोधात बेंगळुरू पोलिसांकडे तक्रार केली.  महिलांसाठी असणाऱ्या बेंगळुरू पोलिसांच्या 'परिहार' (PARIHAR) या हेल्पलाइनवर संपर्क करत तिने यासंदर्भात तक्रार केली होती.तिने तिच्या तक्रारीमध्ये असं म्हटलं आहे की, तिचा नवरा जो किराणामालाचे दुकान चालवतो त्याने लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर दुकान उघडणचं बंद केलं. पैशांची चणचण असताना सुद्धा त्याने दुकान उघडलं नाही. त्यानंतर काही दिवसांनी त्याने अंघोळ करायचं देखील बंद केलं. आपल्या तक्रारीत ही महिला पुढे म्हणाली की, त्याच्या पावलांवर पाऊल ठेवत तिच्या 9 वर्षाच्या मुलाने सुद्धा अंघोळ करणं बंद केलं आहे. तिने वारंवार सांगून सुद्धा तिच्या नवऱ्याने अंघोळ करण्यास नकार दिला आणि तिच्याकडे सारखी सेक्सची मागणी केली. तिने नकार दिल्यानंतर तिला मारहाण सुद्धा केल्याची तक्रार या महिलेने केली आहे. (हे वाचा-लग्न करून बायकोला बाईकवर घेऊन जात होता, पोलिसांनी दिलं असं गिफ्ट) परिहारमध्ये अशा अनके तक्रारींची नोंद करण्यात आली आहे. घरगुती हिंसाचारांच्या घटना लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आढळून येत आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक महिला त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांबरोबर आणि शारीरिक तसंत मानसिक त्रास देणाऱ्यांबरोबर अडकल्या आहेत. कोरोना व्हायरस (Coronavirus) विरोधात लढा देण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र यामुळे अनेक महिला आणि लहान मुलांचा जीव धोक्यात आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या