ऑनलाईन पिझ्झा मागवणं पडलं महागात! एका क्लिकमुळे बसला 95,000चा फटका

ऑनलाईन पिझ्झा मागवणं पडलं महागात! एका क्लिकमुळे बसला 95,000चा फटका

ऑनलाईन पिझ्झा मागवण्याआधी वाचा ही बातमी, नाहीतर बसेल 95 हजारांचा फटका.

  • Share this:

बंगळुरू, 06 डिसेंबर : ऑनलाईन पदार्थ मागवणे सध्या ट्रेंड सुरू झाला आहे. मात्र या सगळ्याचा फटकाही ग्राहकांना बसल्याची प्रकरणं समोर आली आहेत. नुकतेच कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये ऑनलाईन घोटाळ्याचे प्रकरण समोर आले. एका पिझ्झामुळे एका ग्राहकाला तब्बल 95 हजारांचा फटका बसला. तुमच्यासोबतही असा प्रकार घडू शकतो. त्याआधी वाचा नेमकं काय झालं.

एका रिपोर्टनुसार, बेंगळुरू येथे काम करणारे एनव्ही शेख यांनी फूड डिलिव्हरी अ‍ॅपद्वारे 1 डिसेंबर रोजी स्मार्टफोनमधून पिझ्झा मागवला होता. ऑर्डर दिल्यानंतर एका तासानेही त्यांचा पिझ्झा आला नाही. यानंतर त्यांनी कस्टमर केअर ऑफ फूड अ‍ॅपला फोन केला. त्यानंतर त्यांना सांगण्यात आले की, त्यांची ऑर्डर स्वीकारली गेली नाही आणि त्याचा परतावा मिळेल. काही वेळानंतर शेख यांच्या फोनवर एक एसएमएस आला. या मेसेजचा रिप्लाय देण्यासाठी शेख यांनी एका लिंकवर क्लिक केले, त्यानंतर लगेचच त्यांच्या अकाउंटमधून 95 हजार रुपये गेले.

वाचा-लव्ह, सेक्स आणि धोका, अखेर तरुणाला आणले ICUमध्ये आणि लावले लग्न!

पोलिसांकडे गेले प्रकरण

अकाउंटमधून 95 हजार गेल्यानंतर शेख यांनी लगेचच पोलिसात गुन्हा दाखल केला. मुख्य म्हणजे शेख यांनी हे पैसे आईच्या कर्करोगाच्या उपचारासाठी वाचविले होते. या संपूर्ण घटनेवर फूड अ‍ॅप कंपनीने आपण मेजेस करुन ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करतो, असे सांगितले. या कंपनीच्या प्रवक्त्यांनी मिडीयाला दिलेल्या माहितीत, 'आम्ही ग्राहकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. आमच्या ग्राहकांना जागरुक राहण्याचे आणि कोणाबरोबरही वैयक्तिक किंवा बँक खात्याचा तपशील शेअर न करण्याची विनंती करतो. नोव्हेंबरमध्ये, आणखी एक बेंगलुरू रहिवासी पेमेंट अॅप घोटाळ्यात सुमारे 85,000 रुपयांचे नुकसान झाले होते.

वाचा-SBI च्या ग्राहकांसाठी खूशखबर! YONO अ‍ॅप वापरून करा शॉपिंग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 6, 2019 05:52 PM IST

ताज्या बातम्या