News18 Lokmat

'शेतकऱ्यांचा मित्र कोण? गांडूळ, कुमारस्वामी की येडियुरप्पा'

कर्नाटकात येडियुरप्पा स्वत:ला शेतकऱ्यांचा मित्र तर कुमारस्वामी शेतकरी नेता म्हणवतात.

News18 Lokmat | Updated On: Mar 29, 2019 10:49 AM IST

'शेतकऱ्यांचा मित्र कोण? गांडूळ, कुमारस्वामी की येडियुरप्पा'

बेंगळुरु, 29 मार्च : कर्नाटकातील बेंगळुरू येथे एका इंग्रजी माध्यमिक विद्यालयातील शिक्षकाला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. त्यामागे त्याने विद्यार्थ्यांना विचारलेला प्रश्न कारणीभूत ठरला आहे. शिक्षकाने आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला की शेतकऱ्यांचा मित्र कोण? केंचुआ, मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी की भाजप नेते येडियुरप्पा.

आठवीच्या परीक्षेत अशा प्रकारचा प्रश्न विचारणाऱ्या शिक्षकावर शाळा प्रशासनाने कारवाई केली आहे. कन्नड भाषेच्या प्रश्नपत्रिकेत चक्क राजकीय स्वरुपाचा प्रश्न विचारण्यात आला होता. राजकीय दृष्टीकोनातून विचारलेला हा प्रश्न सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर प्राचार्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित शिक्षकाविरुद्ध कारवाई केली. तसेच प्रशासनाला अंधारात ठेवून प्रश्न विचारण्यात आल्याचे प्राचार्यांनी सांगितले. तसेच कोणत्याही पक्षाच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी हा प्रश्न नव्हता असे शाळा प्रशासनाने सांगितले.

कर्नाटकात शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी भाजप नेते येडियुरप्पा स्वत:ला शेतकरी मित्र संबोधतात. तर दुसरीकडे एचडी कुमारस्वामी शेतकऱ्यांचा नेता असल्याचे सांगतात. जेडीएसच्या निवडणूक चिन्हावर एक महिला शेतकरीही दाखवण्यात आली आहे.

VIDEO माझं पहिलं भाषण का ट्रोल झालं? पाहा पार्थ पवार काय म्हणाले..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 29, 2019 10:48 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...