मिठी मारली नाही म्हणून मित्रावर केला चाकूनं हल्ला!

मिठी मारली नाही म्हणून मित्रावर केला चाकूनं हल्ला!

मिठी मारली नाही या शुल्लक कारणावरून एकाने आपल्या मित्रावर चाकूने हल्ला.

  • Share this:

बेंगळुरू, 03 जुलै: पैसे दिले नाही, वाद झाला अशा एक ना अनेक कारणामुळे जीवघेणा हल्ला झाल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. पण बेंगळुरू शहरात जीवघेण्या हल्ल्याची एक अजब घटना घडली आहे. अजब म्हणण्याचे कारण असे की मिठी मारली नाही या शुल्लक कारणावरून एकाने आपल्या मित्रावर चाकूने हल्ला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना रविवारी कलासिपलयम जवळच्या मावली परिसरात घडली.

शोएब आणि नबी हे एकमेकाचे मित्र होते. रविवारी सकाळी 11.45च्या सुमारास दोघांची अचानक भेट झाली. नबीने शोएबला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. पण तोंडातून वास येत असल्याने शोएबने त्याला धक्का दिला. या शुल्लक कारणावरून दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली. नबीने शोएबला शिवी दिली आणि त्यानंतर थेट चाकूने हल्ला केला. नबीने चाकूने शोएबच्या पोटावर वार केले.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार वाद सुरु असताना शोएबने मदतीसाठी भाऊ शहिदला बोलवले. काही वेळातच शाहिद घटनास्थळी दाखल झाला. पण नबीने शाहिदवर देखील चाकूने वार केला. नबीच्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले. हल्ला करून नबी तेथून पळ काढला. जखमी शोएब आणि शाहिद यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या दोघांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सिद्दपुरा येथून नबीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध आयपीसी कलम 307नुसार खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SPECIAL REPORT: ...आणि मैदानात गायीनं घेतला फुटबॉलचा ताबा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2019 01:42 PM IST

ताज्या बातम्या