राष्ट्रगीताला उभा राहिला नाही म्हणून सिनेमागृहात तरूणाला जमावाची मारहाण!

पोलिसांनी तरूणाला राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी बुधवारी अटक केली होती.

News18 Lokmat | Updated On: May 12, 2019 09:17 AM IST

राष्ट्रगीताला उभा राहिला नाही म्हणून सिनेमागृहात तरूणाला जमावाची मारहाण!

बंगळुरू, 12 मे : चित्रपटगृहात राष्ट्रगीताला उभा न राहिल्यानं मारहाणीच्या घटना यापूर्वी मुंबईत देखील समोर आलेल्या आहेत. आता बंगळुरूमध्ये देखील राष्ट्रगीताला उभं न राहिल्यानं 29 वर्षाच्या तरूणाला चित्रपटगृहात जमावाकडून मारहाण करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तरूणाला अटक केली. संजयनगरमधील तरूणानं झालेल्या मारहाणीबद्दल ट्विटरवरून माहिती दिली. जितीन चंद असं या 29 वर्षाच्या तरूणाचं नाव आहे.


साताऱ्यात राज ठाकरेंची सभा उदयनराजेंना तारणार का? पाहा हा SPECIAL REPORT

काय आहे प्रकार

बुधवारी जितीन चंद हा 29 वर्षाच्या तरूण INOX चित्रपटगृहात गेला होता. यावेळी चित्रपटापूर्वी राष्ट्रगीत वाजवलं गेलं. राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ सर्वजण उभे राहिले. पण, तरूण मात्र बसून होता. राष्ट्रगीत संपल्यानंतर जमावानं तरूणाला जाब विचारला. शिवाय, त्याला मारहाण केली. यावेळी माझ्या तोंडावर बुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचं तरूणानं म्हटलं आहे. दरम्यान, मॅनेजरनं चपळाईनं पोलिसांना बोलावून घेतलं त्यानंतर जमावाला हटवत तरूणाची सुटका करण्यात आली. अशी माहिती 29 वर्षाच्या जितीन चंद यानं दिली.

Loading...
'मोदींच्या पराभवासाठी मी कोणताही त्याग करण्यास तयार'

तरूणाविरोधात तक्रार दाखल

मारहाण करणाऱ्यांविरोधात मला तक्रार दाखल करायची होती. पण, पोलिसांनी माझ्याविरोधात तक्रार दाखल केल्याचं तरूणानं म्हटलं आहे. राष्ट्रगीताचा अपमान केल्यां पोलिसांनी तरूणाविरोधात तक्रार दाखल केली आहे. शिवाय, त्याला अटक देखील करण्यात आली होती.

काय आहे कोर्टाचा आदेश

दरम्यान, चित्रपटगृहात राष्ट्रगीत बंधनकारक नाही. तसंच चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजल्यानंतर उभं राहणं देखील बंधनकारक नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निर्णयात म्हटलं आहे.


SPECIAL REPORT: मोदी विरुद्ध विरोधक, केवळ 59 जागांची नाही तर अस्तित्वाची लढाई

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 12, 2019 09:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...