रेवती राजीवन
बंगळुरू, 25 मे : एकीकडे Coronavirus चा धोका वाढतो आहे. दररोज नवा उच्चांकी आकडा समोर येतो आहे आणि आपल्याकडे अजूनही याचं गांभीर्य कसं नाही हे सांगणारा एक VIDEO समोर येत आहे. सामान्य जनता अजूनही या विषाणूच्या संसर्ग टाळण्यासाठीचे नियम कशा पद्धतीने धाब्यावर बसवते किंवा अगतिकपणे गर्दी करते हे आपण सांगू शकत नाही. पण कर्नाटकच्या बंगळुरूचा हा VIDEO परिस्थिती किती धोकायदायक बनू शकते याची एक झलक दाखवतो.
कर्नाटकात चौथ्या लॉकडाऊनमध्ये अनेक व्यवहार खुले करण्यात आले आहेत. त्यानंतर रस्त्यावरची गर्दी वाढली आहे. पण या बंगळुरूतल्या या गर्दीने सगळ्यावर कडी केली. मोफत धान्य घेण्यासाठी महिलांची एवढी मोठी झुंबड उडाली की, पोलीसही हतबल झाले. भारतात एका चुकीमुळे सोशल डिस्टिन्सिंगचा कसा फज्जा उडू शकतो हे सांगणारा हा VIDEO सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
कर्नाटकातले काँग्रेस नेते कृष्णमूर्ती यांनी मोफत धान्य वाटपाचा कार्यक्रम जाहीर केला आणि उत्तर बंगळुरूच्या बागलाकुंटे भागात शेकडो महिलांची झुंबड उडाली. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राज्यातले ज्येष्ठ नेते सिद्धरायमय्या यांच्या उपस्थितीत या मोफत रेशन वाटप कार्यक्रमाचं उद्घाटन झालं होतं हे विशेष. प्रत्यक्ष धान्यवाटप सुरू होताच पोलीस बंदोबस्त असूनही महिलांची एकच झुंबड उडाली.
'त्या' दिवशी काय कष्ट घेतले? संजय राऊतांचा पियूष गोयल यांना थेट सवाल
या व्हायरल झालेल्या व्हिडीओमधून ही महिलांची गर्दी कशी आवरायची हाच प्रश्न पोलिसांनाही पडलेला दिसतो. पोलीसही गर्दी पाहून हतबल झालेले दिसतात. भारतात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळूनच व्यवहार सुरू करायला परवानगी दिली आहे. किमान सहा फुटाचं अंतर राखूनच दुकानात खरेदी व्हायला हवी, प्रवास करायला हवा असे नियम घालून दिलेले आहेत. या सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं म्हणून पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. कर्नाटकातल्या बंगळुरूमध्ये मोफत रेशन घेण्यासाठी चाललेली ही धक्काबुक्की पाहून काय म्हणाल?
कर्नाटकातल्या बंगळुरूमध्ये मोफत रेशन घेण्यासाठी चाललेली ही धक्काबुक्की पाहून काय म्हणाल? सोशल डिस्टन्सिंगचा पुरता बोजवारा उडला होता. पोलिसांनाही गर्दी आवरली नाही. काँग्रेसतर्फे मोफत धान्यवाटपाचा हा कार्यक्रम होता. #coronavirus #Social_Distancing pic.twitter.com/3ShQK3D4QP
— News18Lokmat (@News18lokmat) May 25, 2020
कोरोनाच्या भीतीपेक्षा पोटातली भूक मोठी असं म्हणायचं की, पोलिसांची हतबलता लक्षात घ्यायची? की गर्दी करणाऱ्यांची अगतिकता? परिस्थितीला कारणीभूत ठरवायचं की त्यामागच्या राजकारणाला?
संपादन, संकलन - अरुंधती
अन्य बातम्या
देवेंद्र फडणवीसांची खिल्ली उडवत पृथ्वीराज चव्हाणांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
सरकारने नागरिकांच्या आरोग्याची चिंता करायची की विमानकंपन्यांची? कोर्टाने फटकारलं
पुण्यात कोविड सेंटरवर रुग्णांकडून संतापजनक प्रकार, पोलिसांनी डोक्याला लावला हात
कोकणात जाण्यासाठी 5 हजारांची ई-पाससाठी लूट, नितेश राणेंचा शिवसेनेवर गंभीर आरोप