खळबळजनक; मुलीने प्रियकराच्या मदतीने केली वडिलांची हत्या!

मुलीने प्रियकराच्या मदतीने स्वत:च्या वडिलांचीच हत्या केल्याची खळबळजनक घटना बेंगळूरूमध्ये घडली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 21, 2019 09:26 PM IST

खळबळजनक; मुलीने प्रियकराच्या मदतीने केली वडिलांची हत्या!

बेंगळुरू, 21 ऑगस्ट: मुलीने प्रियकराच्या मदतीने स्वत:च्या वडिलांचीच हत्या केल्याची खळबळजनक घटना बेंगळूरूमध्ये घडली आहे.नववीत शिकणाऱ्या या मुलीचे प्रेमप्रकरण समजल्यानंतर वडिलांनी मोबाईल फोन काढून घेतला होता.या हत्याकांडामुळे बेंगळूरू शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलगी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. बेंगळुरूमधील राजाजी नगर येथे 15 वर्षाच्या मुलीने प्रियकर प्रवीणसह वडील जयकुमार यांची हत्या केली.

शनिवारी रात्री मुलीने वडिलांना दुधातून बेशुद्ध होण्याचे औषध दिले. दूध घेतल्यानंतर वडील जयकुमार खरोखर बेशुद्ध झालेत का हे तपासल्यानंतर मुलीने 19 वर्षीय प्रियकर प्रवीणला घरी बोलवले. प्रथम दोघांनी जयकुमार यांच्यावर चाकूने हल्ला केला. तेथेच त्यांचा मृत्यू झाला होता. नंतर सकाळी मुलीने पेट्रोल पंपावर जाऊन दोन लिटर पेट्रोल आणले. त्या दोघांनी राजकुमार यांना बाथरुममध्ये गेले आणि पेट्रोल टाकून पेटवून दिले.आगीचा भडका उडाल्यानंतर शेजाऱ्यांनी अग्निशमन दलाला बोलवले.आग विझवण्यासाठी जेव्हा बाधरूममध्ये गेले तेव्हा त्यांना जयकुमार यांचा मृतदेह सापडला. अग्निशमन दलाच्या जवानांनी याची माहिती पोलिसांना दिली.

जयकुमार यांच्या मृत्यूबद्दल मुलीकडे चौकशी केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना घराची तपासणी केली असता त्यांना बेडवर रक्ताचे डाग दिसले. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान दोघांनी खुनाची कबूली दिली.जयकुमार यांना पेटवून देताना त्या दोघांचे पाय देखील भाजले होते. जयकुमार मुळचे राजस्थानमधील जोधपूर येथील होते. त्यांचा बेंगळुरूमध्ये दागिन्यांचा मोठा व्यवसाय होता.घरातील सर्व जण जयकुमार यांची पत्नी मुलासह पुद्दूचेरी येथे एका कार्यक्रमासाठी गेली होती तेव्हा संधीचा फायदा घेऊन मुलीने वडीलांची हत्या केली.

SPECIAL REPORT : मौका सभी को मिलता है!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2019 09:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...