Home /News /national /

धक्कादायक! रुग्णावाहिकेअभावी तब्बल 3 तास रस्त्यावर पडून होता कोरोनाग्रस्ताचा मृतदेह

धक्कादायक! रुग्णावाहिकेअभावी तब्बल 3 तास रस्त्यावर पडून होता कोरोनाग्रस्ताचा मृतदेह

बंगळुरूमध्ये कोरोनाची आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारपर्यंत 4649 आकडा पोहोचला आहे.

    बंगळुरू, 04 जुलै : देशभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. रुग्णावाहिकेअभावी मृतदेहाची 3 तास हेळसांड झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर केवळ रुग्णावाहिका उपलब्ध नाही म्हणून तब्बल 3 तास मृतदेह रस्त्यावर पडून होता. त्यानंतर रुग्णवाहिका आली आणि मृतदेह नेण्यात आलं. धक्कादायक बाब म्हणजे या 64 वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. कोरोना पॉझिटिव्ह असल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बृहत बंगळुरू महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार कम्युनिकेशनमध्ये गडबड झाल्यानं रुग्णवाहिका पोहोचण्यास उशीर झाला आहे. या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर बंगळुरुमध्ये शुक्रवारी सुरू असलेल्या पावसामुळे रुग्णवाहिका पोहोचण्यात अडथळे निर्माण झाल्याचंही सांगितलं. बंगळुरूमध्ये कोरोनाची आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारपर्यंत 4649 आकडा पोहोचला आहे. आकडेवारीनुसार बंगळुरुमध्ये कोरोना रूग्णांची संख्या दिल्ली, मुंबई आणि चेन्नईच्या तुलनेत वेगाने वाढत आहे.पण कोरोनाची एकूण प्रकरणे पाहिल्यास बंगळुरू अजूनही इतर महानगरांपेक्षा खूपच मागे आहे. जर ही परिस्थिती राहिली तर लवकरच परिस्थिती चिंताजनक होईल. हे वाचा-COVAXIN - भारत बायोटेक बनवणार जगातील पहिली कोरोना लस? कंपनीने दिली प्रतिक्रिया देशात कोरोनाबाधितांचा (Coronavirus) आकडा मोठ्या तेजीनं वाढत आहे. शुक्रवारी पहिल्यांदा देशात तब्बल नवीन कोरोना रुग्णांचा आकडा हा 21 हजारांच्या घरात गेला. गेल्या 24 तासांत तब्बल 20 हजार 903 रुग्ण सापडले. तर, गेल्या 24 तासांत 379 लोकांचा मृत्यू झाला. यासह भारतातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 6 लाख 25 हजार 544 झाला आहे. देशात सध्या 2 लाख 27 हजार 437 सक्रिय रुग्ण आहेत. तर, 18 हजार 213 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 3 लाख 79 हजार 891 रुग्ण निरोगीही झाले आहेत. देशात सर्वात जास्त कोरोना रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात आहेत . गेल्या 24 तासांत राज्यात 6330 नवीन कोरोना रुग्ण सापडले. तर दिल्लीत 2373. तामिळनाडुमध्ये 4343, उत्तर प्रदेश 817, पश्चिम बंगाल 649, राजस्थान 350 आणि पंजाबमध्ये 120 रुग्ण सापडले. ही आकडेवारी चिंता वाढवणारी असली तरी, भारतात निरोगी रुग्णांची संख्या दिलासा देणारी आहे. भारताचा रिकव्हरी रेट 60% झाला आहे. संकलन, संपादन- क्रांती कानेटकर
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus disease, Coronavirus symptoms, Coronavirus update

    पुढील बातम्या