Home /News /national /

दहशतवादासाठी पाकिस्तान करतोय भारतीय तरुणींचा वापर, लष्करी अधिकाऱ्यांना अडकविणाऱ्या हनीट्रॅपचा खुलासा

दहशतवादासाठी पाकिस्तान करतोय भारतीय तरुणींचा वापर, लष्करी अधिकाऱ्यांना अडकविणाऱ्या हनीट्रॅपचा खुलासा

स्थिनिक तरुणांची माथी भडकावून त्यांना दहशतवादाकडे वळविण्याचं कामही ही तरुणी करत होती असा आरोप होत आहे.

    कोलकाता 13 जून: हेरगिरीच्या आरोपांवरून अटक करण्यात आलेल्या पश्चिम बंगालमधल्या तरुणीचं पाकिस्तानी कनेक्शन समोर आलं आहे. ही तरुणी लष्कर ए तोयबासाठी काम करत होती. भारतीय लष्करी अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती काढून घेणं आणि ती पाकिस्तानमध्ये पुरवणं असं काम ही तरुणी करत असल्याचं उघड झालं आहे. तानिया परवीन (Tania Parvin) असं अटक करण्यात आलेल्या युवतीचं नाव आहे. तानिया ही बंगालच्या उत्तर 24 परगना जिल्ह्यात राहणारी आहे. गुप्त माहिती मिळाल्यानंतर NIAने तिला अटक केली. अधिक चौकशी केल्यानंतर खळबळजनक माहिती हाती लागली आहे. परविन ही पाकिस्तानातल्या अनेक WhatsApp ग्रुपमध्ये जोडलेली होती. हजारो रुपयांचा रिचार्ज करून ती आंतरराष्ट्रीय कॉल्स करत असे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती भारतीय लष्करातल्या अधिकाऱ्यांशी मैत्री करत होती. आणि त्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून ती त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळवीत असे. अतिशय बेताची आर्थिक स्थिती असलेल्या या तरुणीच्या बँक खात्यात कोट्यवधींच्या रकमांची देवघेव झाल्याने संशय आला होता. त्यानंतर तिची चौकशी करण्यात आली. एनआयएन घातलेल्या छाप्यांमध्ये तिच्या घरातून महत्त्वाची कागदपत्र आणि धक्कादायक माहिती मिळाली आहे. स्थिनिक तरुणांची माथी भडकावून त्यांना दहशतवादाकडे वळविण्याचं कामही ही तरुणी करत होती असा आरोप होत आहे. हेही वाचा -  भारतात कोरोनाचं कम्युनिटी ट्रान्समिशन झालं, तज्ज्ञांनी खोडला सरकारचा दावा महिला की पुरुष; CORONA सर्वात जास्त कुणाला बनवतोय आपला शिकार नायब तहसीलदार शिवांगी खरे यांनी ड्रायव्हरकडून चप्पलही करुन घेतली सॅनिटाईज
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या