मराठी बातम्या /बातम्या /देश /

30 वर्षांपासून स्त्रीचं आयुष्य जगणारी महिला निघाली पुरूष, एकाच दिवसात बदललं आयुष्य

30 वर्षांपासून स्त्रीचं आयुष्य जगणारी महिला निघाली पुरूष, एकाच दिवसात बदललं आयुष्य

या नव्या माहितीमुळे त्यांचं आयुष्यच बदलून गेलं आहे. गेल्या 12 वर्षांपासून ती वैवाहिक आयुष्यही जगत  आहे असं डॉक्टंरांनी सांगितलं.

कोलकाता 26 जून: तब्बल 30 वर्षांपासून स्त्रीचं आयुष्य जगत असलेल्या एका महिलेचं आयुष्य एकाच दिवसात बदलून गेलं. या घटनेने डॉक्टरांनाही धक्का बसलाय. पश्चिम बंगालमधल्या बीरभूमी जिल्ह्यातली ही घटना आहे. पोटात दुखत असल्याने (Stomach Pain) ती महिला डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी (Doctor) जेव्हा तिला तपासलं तेव्हा ती महिला (Women) नाही तर पुरुष (Man) असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. तिला कॅन्सरही निघाला. आता तिच्यावर उपचार सुरू आहेत.

काही दिवसांपासून त्या महिलेल्या ओटी पोटात दुखत होतं. त्यामुळे ती डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेली. डॉक्टरांनी जेव्हा तिला तपासलं तेव्हा ती महिला नाही तर पुरुष असल्याचं लक्षात आलं.

डॉक्टरांच्या मतानुसार हा एक प्रकारचा दुर्मिळ आजार असून 22 हजार लोकांमध्ये एखाद्यालाच हा आजार असतो. इतर सर्वासारखीच ती महिला आपलं आयुष्य व्यतित करत होती. तिचं लग्नही झालं आहे. मात्र तिला गर्भधारणा होत नव्हती. तिच्या काही नातेवाईकांनाही अशाच प्रकारचा आजार असल्याचं आढळून आलं आहे.

या नव्या माहितीमुळे त्यांचं आयुष्यच बदलून गेलं आहे. गेल्या 12 वर्षांपासून ती वैवाहिक आयुष्यही जगत  आहे असं डॉक्टंरांनी सांगितलं.

धक्कादायक! तलावात पोहोयला गेला; पेनिसमध्ये घुसली जळू आणि...

डॉक्टरांच्या तपासणीत तिच्या पोटाखालच्या भागात अंडकोष आढळून आलेत. त्याचबरोबर तिला कॅन्सर असल्याचंही आढळून आलं. ही माहिती बाहेर आल्याने तिला आणि तिच्या पतीलाही धक्का बसला आहे. डॉक्टरांनी त्या दोघांचंही समुपदेशन केलं असून त्यांनी पूर्वीसारखच आपलं आयुष्य व्यतीत करावं असा सल्ला त्यांनी दिला आहे.

First published:

Tags: Doctor, Women