मराठी बातम्या /बातम्या /देश /

मोठी बातमी! मंत्र्याच्या गाडीवर बॉम्ब अटॅक; हल्ल्यात मंत्री गंभीर जखमी

मोठी बातमी! मंत्र्याच्या गाडीवर बॉम्ब अटॅक; हल्ल्यात मंत्री गंभीर जखमी

पक्षाच्या बैठकीला जात असताना मंत्र्यावर बॉम्ब हल्ला करण्यात आला आहे.

पक्षाच्या बैठकीला जात असताना मंत्र्यावर बॉम्ब हल्ला करण्यात आला आहे.

पक्षाच्या बैठकीला जात असताना मंत्र्यावर बॉम्ब हल्ला करण्यात आला आहे.

  • Published by:  Priya Lad
कोलकाता, 17 फेब्रुवारी :  पश्चिम बंगालचे मंत्री झाकिर हुसैन (Bengal Labour minister of state Zakir Hossain) यांच्या गाडीवर बॉम्ब हल्ला (bomb attack) झाला आहे. अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कारवर बॉम्ब फेकला. हल्ल्यात झाकिर हुसैन (Zakir Hossain) गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  मुशिर्दाबाद जिल्ह्यातील रघुनाथगंज परिसरातील ही धक्कादायक घटना आहे. झाकिर हुसैन हे कामगार राज्यमंत्री आहेत. कोलकात्यात तृणमुल काँग्रेसची (Trinamool Congress) बैठक होती आणि बैठकीसाठी झाकिर हुसैन रवाना झाले होते. निमतिता स्टेशनच्या दिशेनं जात असताना त्यांच्या कारवर बॉम्ब हल्ला करण्यात आला. ज्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांना तात्काळ जंगीपूर महकमा स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून त्यांना मुर्शिदाबाद मेडिकल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. उद्या त्यांना कोलकात्यात नेलं जाण्याची शक्यता आहे. हे वाचा - राहुल गांधी म्हणाले नवं मत्स्य मंत्रालय स्थापन करा, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली झाकिर यांच्यासोबत असलेले तृणमुल काँग्रेसचे काही कार्यकर्तेदेखील जखमी झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कमीत कमी 13 जण जखमी झाले आहेत. या जखमी कार्यकर्त्यांच्या शरीराचे काही अवयव सर्जरी करून कापावे लागतील, अशी माहिती एका डॉक्टरानं दिली आहे. दरम्यान घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
First published:

Tags: West bengal

पुढील बातम्या