राजकीय पदार्पणाच्या विषयावर सौरव गांगुलीचं मोठं वक्तव्य, म्हणाला...

राजकीय पदार्पणाच्या विषयावर सौरव गांगुलीचं मोठं वक्तव्य, म्हणाला...

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सात तारखेला कोलकातामध्ये होणाऱ्या सभेकडं बंगालचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

  • Share this:

कोलकाता, 5 मार्च :  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सात तारखेला कोलकातामध्ये होणाऱ्या सभेकडे बंगालचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) या सभेत उपस्थित राहून भाजपामध्ये प्रवेश करणार अशी बातमी आहे. त्याचबरोबर टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Gaungly) देखील सभेला  उपस्थित राहणार अशी जोरदार चर्चा आहे. गांगुलीच्या उपस्थितीबद्दल भाजपा कार्यकर्ते आशावादी आहेत. त्याचवेळी स्वत: गांगुलीनं या विषयावर आपलं मौन सोडत एक सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीला गांगुलीलं नुकतीच एक मुलाखत दिली आहे. त्यावेळी गांगुलीला राजकीय पदार्पणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ‘कोणताही व्यक्ती प्रत्येक रोलमध्ये फिट बसू शकत नाही,’ असं सूचक उत्तर गांगुलीनं दिलं आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ नं ही बातमी दिली आहे.

सौरव गांगुलीचे मित्र आणि माकप नेते अशोक भट्टाचार्य (Asok Bhattacharya) यांनी देखील बीसीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष राजकारणात येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. गांगुलीनेच आपल्याला ही माहिती दिल्याचा दावा भट्टाचार्य यांनी केला आहे.

बंगालमध्ये 27 मार्च ते 29 एप्रिल दरम्यान आठ टप्प्यात निवडणुका होणार असून 2 मे रोजी निकाल जाहीर होतील. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा गड असलेल्या बंगालमध्ये सत्ता मिळण्याचा भाजपाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

(वाचा :  मोठी बातमी! पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपची नवी खेळी; प्रसिद्ध अभिनेत्याचा पक्षप्रवेश ठरला )

भाजपा प्रवक्ता शमिक भट्टाचार्य यांनी या विषयावर काही दिवसांपूर्वी प्रतिक्रिया दिली होती. ‘माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं या सभेत उपस्थित राहण्याचं ठरवलं तर त्यांचं सर्वात जास्त स्वागत होईल, असं भट्टाचार्य यांनी सांगितलं आहे. गांगुलीनं त्याच्या तब्येतीचा विचार करत सभेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला, तर नक्कीच गर्दी जास्त होईल. कारण गांगुली खूप लोकप्रिय आहेत, याबाबत अजून निश्चित काही ठरलेलं नाही,’ असं भाजपाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Published by: News18 Desk
First published: March 5, 2021, 3:26 PM IST

ताज्या बातम्या