Budget 2021: अर्थमंत्र्यांच्या एक तासाच्या भाषणादरम्यान गुंतवणुकदारांनी केली 2.44 लाख कोटींची कमाई

Budget 2021: अर्थमंत्र्यांच्या एक तासाच्या भाषणादरम्यान गुंतवणुकदारांनी केली 2.44 लाख कोटींची कमाई

अर्थसंकल्पीय भाषण (Budget 2021) सुरू झाल्यानंतर एका तासाच्या आत बेंचमार्क निर्देशांकात (Benchmark Indices) 3 टक्क्यांची वाढ झाली आहे. आरोग्य सेवा आणि ऑटो क्षेत्रातील घोषणांनी शेअर बाजाराला एक उसळी दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 1 फेब्रुवारी : अर्थसंकल्पीय भाषण (Budget 2021) सुरू झाल्यानंतर एका तासाच्या आत बेंचमार्क निर्देशांकात (Benchmark Indices) 3 टक्क्यांची वाढ झाली आहे. आरोग्य सेवा आणि ऑटो क्षेत्रातील घोषणांनी स्टॉक मार्केटला उसळी दिली आहे. ईकोनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी बीएसई मार्केट कॅप 188.57 लाख कोटींवर पोहोचल्याने भाषणाच्या अवघ्या अर्ध्या तासामध्ये बाजारपेठांनी 2.44 लाख कोटींची कमाई केली.

इंडसइंड बँकेच्या शेअरर्समध्ये भरघोस 10.00 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, आयसीआयसीआय बँक 6.49 टक्के, एचडीएफसी 4.20 टक्के, हिंडाल्को इंडेक्स 4.15 टक्के, बजाज फिनसर्व्ह 4.13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सोमवारी एनएसई निफ्टी निर्देशांकात मोठी उचल झाली आहे. यात 257.5 पॉईंटनं वाढ होऊन निफ्टी 13892.1 वर पोहोचला आहे.

पीअर सेन्सेक्स 913.97 अंकांनी वधारून 47199.74 वर पोहोचला. दुसरीकडे बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 166.05 अंकांनी वाढून 18248.28 वर बंद झाला.

(वाचा - सोन्याच्या खरेदी-विक्रीबाबत अर्थमंत्र्यांची घोषणा; SEBI ठेवणार व्यवहारावर लक्ष)

आतापर्यंतच्या अधिवेशनात  वोडाफोन आयडिया, टाटा मोटर्स, सेल, एईएस बँक आणि पीएनबी या कंपन्या एनएसईवर सर्वाधिक ट्रेड झाल्या आहेत. तर, मूल्याच्या बाबतीत टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, आरआयएल आणि एचडीएफसी यांचा समावेश आहे.

(वाचा - Budget 2021: इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल?)

निर्देशांकात जास्तीत जास्त वेटेज असलेले बीएसई बँकेक्स 3.25 टक्क्यांनी वधारले आहेत. तर आणखी एक महत्त्वाचा घटक आयटी निर्देशांक  0.21 टक्क्यांनी वधारला आहे. तर, कॅपिटल गुड्स निर्देशांक 3.17, तेल आणि गॅस निर्देशांक 1.4 टक्क्यांनी वधारला आहे.

Published by: Kiran Pharate
First published: February 1, 2021, 1:53 PM IST

ताज्या बातम्या