Home /News /national /

Belgaum Election result: महाराष्ट्र एकीकरण समितीचे चार उमेदवार विजयी

Belgaum Election result: महाराष्ट्र एकीकरण समितीचे चार उमेदवार विजयी

Belgaum Election result: महाराष्ट्र एकीकरण समितीनं आपलं पहिलं खातं उघडलं. त्यानंतर समितीचे चार उमेदवार विजयी झालेत.

    बेळगाव, 06 सप्टेंबर: बेळगाव महानगरपालिकेच्या (Belgaum Municipal Corporation Election) निवडणुकीची मतमोजणीला (Belgaum Election Result)सुरुवात होताच महाराष्ट्र एकीकरण समितीनं आपलं पहिलं खातं उघडलं. त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीचे चार उमेदवार विजयी झालेत. पहिल्यांदा महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शिवाजी मंडोळकर विजयी झालेत. वॉर्ड क्रमांक 14 मधून त्यांनी विजय मिळवला आहे. त्यानंतर वार्ड क्रमांक 27 मधून रवी साळुंखे विजय आणि वार्ड क्रमांक 19 मधून अंकुश केसरकर विजयी झालेत. आतापर्यंत 58 पैकी चार जागांवर महाराष्ट्र एकीकरण समितीनं आपल्या विजयाचा झेंडा रोवला आहे. एकूण 58 जागांसाठी मतदान पार पडलं आहे. त्याची आज मतमोजणी होईल. एकूण 385 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत अधिकृत 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर भाजप 55, काँग्रेस 45 जेडीएस 11, आम आदमी 37, एआयएमआयएम 7, अन्य दोन आणि अपक्ष 217 उमेदवारांचे भवितव्य आज ठरेल. मात्र भाजप आणि काँग्रेस या दोन्ही मोठ्या राष्ट्रीय पक्षांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच मोठं आव्हान असेल. T20 World Cup 2021 : टीम इंडियातील 15 सदस्य ठरले! वाचा संपूर्ण यादी  1500 पोलिसांची नेमणूक आजच्या मतमोजणीसाठी केंद्रात 500 पोलीस तैनात करण्यात आलेत. तर मतमोजणी केंद्राच्या आवारात कलम 144 जारी केला आहे. तर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडून नये यासाठी 1500 पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. तसंच प्रशासनानं मतमोजणी केंद्राच्या दिशेनं जाणारे सर्व रस्त्यांवर बॅरिकेड्स लावले आहेत. दुपारी 12 वाजेपर्यंत निवडणुकीचा सर्व निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Belgaum, Election, Election 2021

    पुढील बातम्या