Home /News /national /

Belgaum Election result: महाराष्ट्र एकीकरण समितीनं उघडलं पहिलं खातं, शिवाजी मंडोळकर विजयी

Belgaum Election result: महाराष्ट्र एकीकरण समितीनं उघडलं पहिलं खातं, शिवाजी मंडोळकर विजयी

Belgaum Election result: बेळगाव महानगरपालिकेच्या (Belgaum Municipal Corporation Election) निवडणुकीची मतमोजणीला (Belgaum Election Result)सुरुवात झाली आहे.

    बेळगाव, 06 सप्टेंबर:   बेळगाव महानगरपालिकेच्या (Belgaum Municipal Corporation Election) निवडणुकीची मतमोजणी (Belgaum Election Result)सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीनं आपलं पहिलं खातं उघडलं आहे.  वॉर्ड क्रमांक 14 मधून म. ए. समितीचे शिवाजी मंडोळकर विजयी झालेत. विजयी उमेदवार काँग्रेस- 4 महाराष्ट्र एकीकरण समिती- 1 अपक्ष- 2 भाजप- 4 एमआयएम- 1 Belgaum Election result : महाराष्ट्र एकीकरण समितीचा पहिला विजय, 4 उमेदवार आघाडीवर वॉर्ड क्रमांक 1 मधून इकरा मुल्ला विजयी वॉर्ड क्रमांक 12 अपक्ष उमेदवार मोदीमसाब मतवाले विजयी वॉर्ड नंबर 14 मधून महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिवाजी मंडूळकर विजयी वॉर्ड नंबर 15 मधून भाजपच्या नेत्रा भगवती विजयी वॉर्ड क्रमांक 19 मधून अपक्ष उमेदवार रियाज अहमद किल्लेदार विजयी वॉर्ड क्रमांक 21 मधून भाजपच्या उमेदवार प्रीती कामगार विजयी वॉर्ड क्रमांक 40 भाजप उमेदवार रेश्मा बसवराज कामकर विजयी या निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्ष म्हणजे भाजप आणि काँग्रेस हे उतरले. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीनं (Maharashtra Ekikaran Samiti) त्यांना तगडं आव्हान दिलंय. 1500 पोलिसांची नेमणूक आजच्या मतमोजणीसाठी केंद्रात 500 पोलीस तैनात करण्यात आलेत. तर मतमोजणी केंद्राच्या आवारात कलम 144 जारी केला आहे. तर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडून नये यासाठी 1500 पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. तसंच प्रशासनानं मतमोजणी केंद्राच्या दिशेनं जाणारे सर्व रस्त्यांवर बॅरिकेड्स लावले आहेत. दुपारी 12 वाजेपर्यंत निवडणुकीचा सर्व निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Election

    पुढील बातम्या