मराठी बातम्या /बातम्या /देश /

Belgaum Election results : महाराष्ट्र एकीकरण समितीचा पहिला विजय, 4 उमेदवार आघाडीवर

Belgaum Election results : महाराष्ट्र एकीकरण समितीचा पहिला विजय, 4 उमेदवार आघाडीवर

Belgaum Election results: बेळगाव महानगरपालिकेच्या (Belgaum Municipal Corporation Election) निवडणुकीची मतमोजणी (Belgaum Election Result)सुरु झाली आहे. सकाळी आठ वाजता 415 टेबलवर मतमोजणीला सुरुवात झाली.

  • Published by:  Pooja Vichare

बेळगाव, 06 सप्टेंबर: बेळगाव महानगरपालिकेच्या (Belgaum Municipal Corporation Election) निवडणुकीची मतमोजणी (Belgaum Election Result)सुरु झाली आहे. सकाळी आठ वाजता 415 टेबलवर मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र एकीकरण समितीचे 4 उमेदवार आघाडीवर आहेत.

मोठी बातमी म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समितीचा पहिला विजयाची नोंद झाली आहे. वॉर्ड क्रमांक 14 मधून म. ए. समितीचे शिवाजी मंडोळकर विजयी झालेत. मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

या निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्ष म्हणजे भाजप आणि काँग्रेस हे उतरले. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीनं (Maharashtra Ekikaran Samiti) त्यांना तगडं आव्हान दिलंय.

निवडणूक अपडेट

महाराष्ट्र एकीकरण समिती 1

भाजप : 4

काँग्रेस : 4

अपक्ष : 2

एमआयएम : 1

21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत अधिकृत 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर भाजप 55, काँग्रेस 45 जेडीएस 11, आम आदमी 37, एआयएमआयएम 7, अन्य दोन आणि अपक्ष 217 उमेदवारांचे भवितव्य आज ठरेल. मात्र भाजप आणि काँग्रेस या दोन्ही मोठ्या राष्ट्रीय पक्षांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच मोठं आव्हान असेल.

1500 पोलिसांची नेमणूक

आजच्या मतमोजणीसाठी केंद्रात 500 पोलीस तैनात करण्यात आलेत. तर मतमोजणी केंद्राच्या आवारात कलम 144 जारी केला आहे. तर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडून नये यासाठी 1500 पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे.

तसंच प्रशासनानं मतमोजणी केंद्राच्या दिशेनं जाणारे सर्व रस्त्यांवर बॅरिकेड्स लावले आहेत. दुपारी 12 वाजेपर्यंत निवडणुकीचा सर्व निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

First published: