Home /News /national /

Belgaum Election result: बेळगाव महापालिकेत भाजपचीच हवा, स्पष्ट बहुमत

Belgaum Election result: बेळगाव महापालिकेत भाजपचीच हवा, स्पष्ट बहुमत

Belgaum Election live update: समोर आलेल्या निकालाच्या अपडेटनुसार बेळगाव महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे.

    बेळगाव, 06 सप्टेंबर: बेळगाव महानगरपालिकेच्या (Belgaum Municipal Corporation Election) निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. समोर आलेल्या निकालाच्या अपडेटनुसार बेळगाव महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. थोड्या वेळापूर्वी भाजप आघाडीवर होतं. तसंच भाजपचे आठ उमेदवार विजयी झालेत. बेळगाव निवडणूक अपडेट महाराष्ट्र एकीकरण समिती- 4 भाजप- 8 काँग्रेस- 4 अपक्ष- 5 एमआयएम- 1 वॉर्ड नंबर 15 मधून भाजपच्या नेत्रा भगवती विजयी वॉर्ड क्रमांक 21 मधून भाजपच्या उमेदवार प्रीती कामगार विजयी वॉर्ड क्रमांक 40 भाजप उमेदवार रेश्मा बसवराज कामकर विजयी Belgaum Election result: महाराष्ट्र एकीकरण समितीचे चार उमेदवार विजयी महाराष्ट्र एकीकरण समितीचे चार उमेदवार विजयी मतमोजणीला (Belgaum Election Result)सुरुवात होताच महाराष्ट्र एकीकरण समितीनं आपलं पहिलं खातं उघडलं. त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीचे चार उमेदवार विजयी झालेत. पहिल्यांदा महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शिवाजी मंडोळकर विजयी झालेत. वॉर्ड क्रमांक 14 मधून त्यांनी विजय मिळवला आहे. त्यानंतर वार्ड क्रमांक 27 मधून रवी साळुंखे विजय आणि वार्ड क्रमांक 19 मधून अंकुश केसरकर विजयी झालेत. आतापर्यंत 58 पैकी चार जागांवर महाराष्ट्र एकीकरण समितीनं आपल्या विजयाचा झेंडा रोवला आहे. एकूण 58 जागांसाठी मतदान पार पडलं आहे. त्याची आज मतमोजणी होईल. एकूण 385 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत अधिकृत 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर भाजप 55, काँग्रेस 45 जेडीएस 11, आम आदमी 37, एआयएमआयएम 7, अन्य दोन आणि अपक्ष 217 उमेदवारांचे भवितव्य आज ठरेल. मात्र भाजप आणि काँग्रेस या दोन्ही मोठ्या राष्ट्रीय पक्षांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच मोठं आव्हान असेल.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Belgaum, BJP, Election 2021

    पुढील बातम्या