Home /News /national /

काही क्षण समाधानाचे असतात, 'हा' फोटोदेखील त्यापैकीच एक, ही कहाणी तुम्हाला भावुक करेल

काही क्षण समाधानाचे असतात, 'हा' फोटोदेखील त्यापैकीच एक, ही कहाणी तुम्हाला भावुक करेल

एखाद्याला हा फोटो कदाचित सर्वसामान्य वाटेल. मात्र त्या फोटोमागली कहाणी तुमच्या हृदयाला स्पर्श करेल.

  नवी दिल्ली, 25 मार्च : एखाद्याला हा फोटो कदाचित सर्वसामान्य वाटेल. मात्र त्या फोटोमागली कहाणी तुमच्या हृदयाला स्पर्श करेल. हा फोटो हिमानी नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा फोटो शेअर करताना तिने यामागील सुंदर अशी कहाणीही कथन केली आहे. मूल झाल्यानंतर महिलेचं आयुष्यच बदलतं. जणू काही तिच्या आयुष्याला एक वेगळीच दिशा मिळते. असं असताना मुलं, करिअर, संसार या सर्वाचा गाडा एकत्रितपणे चालवताना तिची दमछाक होते. अशावेळी काही पती आपली जबाबदारी ओळखतात आणि मुलाची जबाबादारीही वाटून घेतात. या रिक्षाचालकालाही आपल्या जबाबदारीची जाणीव आहे. आपल्या 2 ते 3 वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन रिक्षाचालक आपलं काम करताना दिसत आहे. जेव्हा हिमानीने त्याला मुलाबद्दल विचारलं तर त्याने सांगितलं की, आज मुलाची आई शाळेत रुजू झाली, त्यामुळे आज तो माझ्यासोबत आहे. उद्या माझी आई म्हणजे याची आजी आली की ती याला सांभाळेल.
  मध्येच मूल पाण्यासाठी तर कधी खाण्यासाठी रडू लागलं, रिक्षाचालकाने दोन्ही वेळेस अगदी आईसारखंच त्याला साभाळलं. रेडलाइट आल्यावर रिक्षा थांबली तर त्याने मुलाला पाणी प्यायला दिलं. मध्ये एक बिस्कीटही दिलं.
  अशा अनेक महिलांना मुलासह कामाची जबाबदारीही पार पाडावी लागते. मात्र दुर्देवाने प्रत्येक महिलेसोबत इतके समजूतदार पती नसतात. त्यामुळे अनेकदा तिला मानसिक ताणाला सामोरं जावं लागतं. दुसरीकडे मुलाला सांभाळणाऱ्या वडिलांकडे समाज वेगवेगळ्या अर्थाने पाहतो. कोणी त्याच कौतुक करतं कर कोणी त्याला नावंही ठेवलं. असो..पण अशा सर्वातही काही पुरुष बापपणाची आपली जबाबदारी पार पाडत आहेत. आणि यामुळे महिलांना आकाशात उडण्याचं बळही मिळत आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Social media, Viral photo

  पुढील बातम्या