लेफ्ट. उमर फैयाज यांच्या हत्येमागे हिजबुल मुजाहिद्दीन असल्याचा संशय

हे भ्याड कृत्य करणाऱ्या सहा दहशतवाद्यांची ओळख पटली आहे, असा दावा सुरक्षा यंत्रणांनी केला आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: May 12, 2017 12:00 PM IST

लेफ्ट. उमर फैयाज यांच्या हत्येमागे हिजबुल मुजाहिद्दीन असल्याचा संशय

12 मे : शहीद लेफ्टनंट उमर फैयाज यांच्या हत्येमागे हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय अाहे. हे भ्याड कृत्य करणाऱ्या सहा दहशतवाद्यांची ओळख पटली आहे, असा दावा सुरक्षा यंत्रणांनी केला आहे.

दक्षिण काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात उमर फैयाज यांचा मृतदेह आढळला होता. रजेवर असलेले फैयाज नातेवाईकांकडे लग्नासाठी गेले असता तिथून अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती.

या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली अाहे. लष्कराने फयाज यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी कंबर कसली आहे.

काश्मीर विभागाचे पोलीस महानिरीक्षक एस. जे. एम. गिलानी म्हणाले की, 'फैयाज यांची हत्या झाली तिथे इन्सास रायफलच्या गोळ्यांच्या पुंगळ्या मिळाल्या होत्या. गेल्या काही दिवसांत कुलगाम आणि सोपियान इथे अतिरेक्यांनी सुरक्षा दलांकडून अशा रायफली पळवल्या होत्या.

कुलगाममध्ये लष्करच्या तर सोपियानमध्ये तैयबाच्या अतिरेक्यांनी ही लूट केली होती. त्यामुळे लुटलेल्या त्या रायफलचाच फैयाज यांच्या हत्येसाठी वापर केला गेला. यात लष्कर आणि  तैयबाचे अतिरेकी होते, असा सुगावा मिळतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 12, 2017 12:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...