'मॅच'च्या आदल्या रात्री पकिस्तानच्या टीमची सानिया सोबत पार्टी, VIDEO व्हायरल

'मॅच'च्या आदल्या रात्री पकिस्तानच्या टीमची सानिया सोबत पार्टी, VIDEO व्हायरल

दुसऱ्या दिवशी मॅच असताना रात्री पार्टी करणं, मौज करणं शोभत का? जनाची नाहीतर मनाची काही लाज आहे की नाही असाही संतप्त सवाल या खेळाडूंना करण्यात येतोय.

  • Share this:

मँचेस्टर 17 जून :  रविवारी झालेल्या क्रिकेट सामन्यात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. असं असतानाच पाकिस्तानी क्रिकेट रसिकांच्या संतापात आणखी भर पडलीय ती एका VIDEOमुळे. मॅचच्या आदल्या रात्री पाकिस्ताची टीम एका नाईट पार्टीत मश्गुल असल्याचं त्या व्हिडीओत दिसून येतंय. या टीमसोबत शोएब मलिकची पत्नी आणि भारताची टेनिसपटू सानिय मिर्झाही दिसतेय.  हा VIDEO व्हायरल झाल्यानंतर क्रिकेटप्रेमींनी सोशल मीडियावर पाकिस्तानी क्रिकेट संघाची पुन्हा एकदा धुलाई केलीय.

मँचेस्टरच्या प्रसिद्ध शीशा नाईट क्लबमध्ये पाकिस्तानी खेळाडू आणि त्यांच्या बायका गेल्या होत्या. तिथे त्यांनी मौज-मस्ती केली. काही पाकिस्तानी खेळाडू हुक्का पितानाही व्हिडीओमध्ये दिसत आहेत. सानियाने या व्हिडीओवर आक्षेप घेतलाय. आम्हाला न विचारताच कुणीतरी चोरून हा व्हिडीओ काढलाय. त्यावेळी आमच्यासोबत आमची मुलंही होती हे आमच्या  खासगी आयुष्यावर अतिक्रमण आहे असंही सानियाने म्हटलंय.

तर क्रिकेटप्रेमींनी जोरदार टीका केलीय. दुसऱ्या दिवशी मॅच असताना रात्री पार्टी करणं, मौज करणं शोभत का? जनाची नाहीतर मनाची काही  लाज आहे की नाही असाही संतप्त सवाल या खेळाडूंना करण्यात येतोय.

पाकिस्तानवर आणखी एक स्ट्राईक

ICC Cricket World Cup मध्ये रविवारी (16 जून) झालेल्या हायव्होल्टेज सामन्यात टीम इंडियानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 89 धावांनी हरवलं. भारतानं पाकिस्तानसमोर 337 धावांचे आव्हान ठेवलं होतं. पावसामुळे पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार 5 षटकांत 136 धावांचे अशक्यप्राय आव्हान देण्यात आलं मात्र त्यांचा खेळ 212 धावांवर आटोपला आणि भारताने 89 धावांनी विजय मिळवला. वर्ल्ड कपदरम्यान भारतानं पाकिस्तानवर मिळवलेला हा सातवा विजय आहे. या विजयानंतर टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही टीम इंडियाला ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या. त्याचं हे ट्विट सर्वाधिक चर्चेत राहिलं आहे.

'आणखी एक स्ट्राईक'

टीम इंडियाच्या विजयावर अमित शहा यांनी ट्विट केलं की,'टीम इंडियाचा पाकिस्तानवर आणखी एक स्ट्राईक आणि याचे परिणामदेखील तसेच दिसून आले आहेत.'पुढे त्यांनी असंही म्हटलं की, 'शानदार खेळीसाठी संपूर्ण टीमचे अभिनंदन. प्रत्येक भारतीय नागरिकाला या विजयावर गर्व आहे आणि याचा जल्लोष साजरा केला जात आहे.'

अमित शहांचं हे ट्विट सोशल मीडिया प्रचंड शेअर केले जात आहे आणि युजर्सकडून यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रियादेखील व्यक्त करण्यात आल्या आहेत.

First Published: Jun 17, 2019 03:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading