गुवाहाटी, 27 नोव्हेंबर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार गुवाहाटीच्या दौऱ्यावर आहे. शनिवारी मुख्यमंत्र्यांसह सर्व आमदारांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतलं. पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा आज सकाळी कामाख्या देवाच्या नियमीत होणाऱ्या प्रातपूजेला कुटुंबासह उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
दररोज सकाळी 8 वाजता माँ कामाख्या देवीची प्रातपूजा केली जाते. या पुजेला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवीचे भक्त असल्यामुळे ते आज सकाळी होणाऱ्या पुजेसाठी आवर्जून उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
('...हा राजद्रोहच म्हणायला हवा', संजय राऊत राज्यपालांवर भडकले)
काल शनिवारीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सहकारी आमदार आणि खासदारांसह माँ कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. आज सकाळी १० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदार आणि खासदार मुंबईसाठी विमानाने रवाना होणार आहेत.
(वाचा - देवेंद्रजी जनाची नाही तर मनाची तरी लाज.. ठाकरेंनी भरसभेत तो व्हिडीओ केला प्ले)
दरम्यान, रविवारी रात्री हॅाटेल रेडीसन ब्लूमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सर्मा सर्व आमदार आणि खासदारांची भेट झाली. हॅाटेल रेडिसन ब्लू मधील मुख्य सभागृहात सर्व आमदार आणि खासदार जमा झाले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसामचे मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी मंत्र्यांचा सिद्धिविनायक गणेश मूर्तीची प्रतिकृती सदिच्छा भेट म्हणून दिली. तर आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सर्मा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आसामचे पारंपरिक स्मृर्ती चिन्हं भेट देईन सत्कार केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi news